डॅनियल अँन्थोनी, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पिंपरी:- पिंपरी चिंचवड शहरात दहशत निर्माण करणाऱ्या रावण टोळीची पोलिसांनी दहशत मोडीत काढली आहे .आतापर्यंत या टोळीतील १२ जणांवर मोका महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम कायदा अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तसेच या टोळीतील फरार सदस्याला चिखली पोलिसांनी वडोदरा (गुजरात) मधून अटक केली आहे. कपिल उर्फ विजय दीपक लोखंडे हा वडोदरा गुजरात असे अटक केलेल्या रावण टोळीतील फरार सदस्याचे नाव आहे.
चिखलीतील सोन्या तापकीर याच्या खुनामध्ये रावण टोळीचा सहभाग होता. सोन्याचा खून झाल्यापासून कपिल लोखंडे हा फरार होता.
पोलीस उप आयुक्त डॉ.काकासाहेब डोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस आयुक्ताच्या वतीने शहरातील गुन्हेगारी टोळ्याच्या समूळ बीमोड करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्याकरिता गुन्हेगारावर मोका पॅटर्नचा धडाका सुरू आहे. चिखलीतील सोन्या तापकीर खूप प्रकरणात रावण टोळीच्या सोन्या पानसरे आणि सिद्धार्थ कांबळे याला यापूर्वी अटक केली आहे. या टोळीतील सदस्य कपिल उर्फ विजय लोखंडे याचा पोलीस शोध घेत होते.
चिखली परिसरात या टोळीचा प्रमुख करन रतन रोकडे आणि मुंग्या उर्फ ऋतिक रतन रोकडे या बंधूंनी आपल्या स्वतंत्र टोळी निर्माण करून दहशत निर्माण केली. ती या दोघांच्या टोळी विरुद्ध आत्तापर्यंत खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, कोयत्याचा धाक दाखवून व अग्नि शस्त्र वापर करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, गंभीर दुखापत करणे अशा प्रकारचे एकूण २१ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. या दोघा भावांवर यापूर्वी मोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे.
चिखलीमध्ये (ता.२२)मे २०२२रोजी सोन्या तापकीर याचा गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. या कटाचा मास्टरमाईंड रोकडे बंधू होता तसेच सोन्या तापकीरचा खून झाल्यानंतर हे सर्व वेगवेगळ्या दिशेला पसार झाले होते. या टोळीतील सचिन गायकवाड याला तडीपार केल्यानंतर तो साताराला निघून गेला होता मात्र सोन्याचा खुनाचा कटात आपण सहभागी नाही हे पोलिसांना दाखवण्यासाठी तो सातारा पोलीस स्टेशन येथील सीसीटीव्ही कॅमेरा खाली थांबून राहिला होता. तसेच पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्याचे मोबाईल फोन सुरू ठेवून ते मोबाईल फोन घरीच ठेवले होत. तसेच वारंवार राहण्याचे ठिकाण बदलत होते. त्यामुळे या खुनात सहभाग असलेल्या आरोपीला पकडणे पोलिसांसमोरील प्रकारचे आव्हानात्मक झाले होते.
या गुन्ह्यातील आरोपी कपिल लोखंडे हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. त्याच्या शेवटच्या मोबाईल लोकेशन तपासल्या असता तो वडदरा गुजरात येथील निघाले. चिखली पोलीसाचे एक पथक गुजरात मध्ये पोचले असता, आरोपी कपिल लोखंडे हा तेथून पसार झाला. पोलिसांनी तांत्रिक तपास केला असता तो इंस्टाग्राम वरून त्याच्या चिखलीतील मैत्रिणींशी संपर्क केले असल्याची माहिती पोलिसाकडे प्राप्त झाली. त्या मैत्रिणींला ताब्यात घेऊन सापळा रचला आणि आरोपी कपिल लोखंडे याला ताब्यात घेतले.
ही कारवाई चिखली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर पोलीस निरीक्षक भानुदास बर्गे, सहाय्यक पोलीस निरीक्षक तौफिक सय्यद, उपनिरीक्षक पुजारी, कुमटकर, बारवरकर,सहायक उपनिरीक्षक वाडेकर, हवालदार नांगरे, तारळकर, साकोरे, जाधव, पिंजारी, केदार, तांत्रिक पथकाचे नागेश माळी यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

