आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- पोलिसांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. राज्याच्या पोलीस महासंचालकांनी उत्कृष्ट तपास कार्याचा पुरस्कार वर्धा पोलिसांना जाहीर केला आहे. गत दहा महिन्यांच्या कामगिरीच्या आधारे ही निवड करण्यात आली आहे. प्रामुख्याने आर्वी कारंजा परिसरात घडलेले प्रकरण व त्याचा तपास उत्कृष्ट ठरले. कोणताही सबळ पुरावा नसताना येथील महिला जळीत कांडातील आरोपींना हुडकून काढण्यात वर्धा पोलिसांना यश आले होते.
या तपासात बाराशेवर महिलांची तपासणी करण्यात आली होती. सतेफळ येथील जंगलातून अखेर आरोपी पकडण्यात आले. हा तपास राज्य गुन्हे अन्वेषण शाखेकडे पाठविण्यात आला. संपूर्ण राज्यातून असे तपास कार्य पुरस्कारासाठी विचारार्थ होते. त्यात वर्धा तपास अव्वल ठरला. पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांनी ऑक्टोंबर २०२२ मध्ये पदभार सांभाळल्यानंतर हे सर्वात आव्हानात्मक प्रकरण होते. त्यासाठी रोख दहा हजार रुपये व प्रमाणपत्र स्वरूपातील पुरस्कारासाठी निवड झाली. हसन यांनी स्थानिक गुन्हे शाखा तसेच तळेगाव पोलीस पथकाचे कौतुक केले आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348