हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मो. 9764268694
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेसनं चंद्रपूर जिल्हाचे माजी पालकमंत्री विदर्भातील नेते विजय वडेट्टीवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्या मध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
बल्लारपूर शहरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ गुरुवरला विजय वडेट्टीवार यांची राज्याच्या विधान सभेतील विरोधी पक्षनेते पदावर निवड झाल्याबद्दल बल्लारपुर विधानसभेचे उपाध्यक्ष व युवा नेते राजेश नक्कावार यांच्या नेत्वृताखाली फटाके फोडून आणि ढोल ताशांच्या गजरात मिठाई वाटून आनंद साजरा करण्यात आला. यावेळी काँग्रेस पक्षाचे शेकडो कार्यकर्ते व नगरिक उपस्थित होते. यावेळी सर्वांनी नवीन विरोधी पक्षनेते यांना पुढील कार्यासाठी शुभेच्या दिल्या.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर विधानसभेत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या महाविकास आघाडीतील काँग्रेसनं विधानसभेतील विरोधी पक्षनेत्याच्या नावाची घोषणा केली आहे. विदर्भातील आक्रमक नेते विजय वडेट्टीवार यांची या पदावर नेमणूक करण्यात आली आहे. सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनातच त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली.
विजय वडेट्टीवार हे चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीचे आमदार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते विधानसभेत निवडून येत आहेत. त्यांना संसदीय कामकाजाचा व मंत्रिपदाचाही उत्तम अनुभव आहे. आक्रमक नेते म्हणून ते ओळखले जातात. ओबीसी समाजातून आलेले वडेट्टीवार हे कुशल संघटक आहेत. ओबीसीच्या प्रश्नावरही ते सातत्यानं भूमिका मांडत असतात. वडेट्टीवार यांच्याकडं जबाबदारी देऊन विधानसभेत आणि विदर्भातील निवडणुकीच्या मैदानातही भाजपला घेरण्याची काँग्रेसची रणनीती आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348