✒️राज शिर्के, मुंबई प्रतिनिधी (पवई)
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- पवई विभागातील फिल्टरपाडा, महात्मा फुले नगर, जयभीम नगर मोरारजी नगर, नीटी, युनिट नंबर २२ या परिसरात राहणाऱ्या बरेच नागरिक बेस्ट बसेस मध्ये प्रवास करत आहेत. आणि त्यांना प्रचंड असा त्रास बस क्रमांक १८६ मध्ये करावा लागत आहे त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात महिला वर्ग आणि विद्यार्थी प्रवास करत आहेत. परंतु विहार लेक ते अंधेरी स्थानक (पूर्व) येथे चालत असलेल्या बस क्रमांक १८६ मिनी बसेस असल्यामुळे कामावर लवकर पोहोचण्यासाठी व विद्यार्थी यांना शाळा / कॉलेज मध्ये जाण्यास प्रचंड असा त्रास सहन करावा लागत आहे.
येथील स्थानिक रहिवाशांनी अंधेरी विधानसभेच्या आमदार श्रीमती ऋतुजा लटके यांच्याकडे तक्रार केली. त्याची त्वरित दखल घेत त्यांनी मजास आगार ला त्या मार्गावर नवीन बस सुरू करण्या साठी निवेदन दिले. व त्याचा पाठपुरावा मी स्वतः करून लवकरात लवकर तेथे मोठ्या बस सेवा सुरू करण्यात याव्या असे बेस्ट व्यवस्थापक अधिकारी यांना निवेदन दिले आहे. तरी मजास आगारातील बेस्ट व्यवस्थापक अधिकारी यांनी लवकरात लवकर त्याचा पाठपुरावा करू आणि बसेस चालू करू असे आश्वासन दिले आहे. असे यावेळी आमदार श्रीमती ऋतुजा लटके यांनी सांगितले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

