उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सागली:- जिल्हातील शिराळा तालुक्यातील मांगले येथून एक मन हेलावणारी दुःखद घटना समोर आली आहे. येथे राहणारा तुषार गणपती पांढरबळे वय 24 वर्ष मूळ गाव-बिलाशी याने वारणा नदीवरील मांगले-सावर्डे दरम्यानच्या असलेल्या बंधाऱ्यावरून वारणा नदीत उडी मारली. ही घटना समोर येताच संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. एनडीआरएफची टीम वारणा नदीपात्रात त्याचा शोध घेत आहे.
24 वर्षीय तुषार गणपती पांढरबळे हा मूळचा बिलाशी गावचा रहिवासी असून तो आईसोबत मांगले येथे राहत होता. शनिवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास त्याने आपल्या मोबाईल फोनवर व्हिडिओ कॉलवर बोलत असताना वारणा नदीवरील मांगले-सावर्डे दरम्यानच्या बांधावरून उडी मारली.
दरम्यान, तेथील मासेमारी करणाऱ्या लोकांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत त्याने पाण्यात उडी मारली. दरम्यान, नदीत उडी मारण्याच्या काही तास आधी त्याने ‘मला शोधण्याचा प्रयत्न करू नये. मी कुठेच सापडणार नाही, तुझ्या आठवणीत राहीन पण तुझ्या आयुष्यात परत येणार नाही.’ असे मोबाईल स्टेटस ठेवले होते.
तुषार शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास मांगले-सावर्डे धरणावर गेला होता. तो बराच वेळ धरणावर मोबाईल फोनवर बोलत होता. तो धरणाच्या काठावर जाऊन बोलू लागला त्यावेळी तेथील मासेमारी करणाऱ्या लोकांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. पण त्याने स्वतःला पाण्यात फेकून दिले.
दरम्यान, वारणा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाहत असल्याने तुषारने झेप घेताच तो नदीच्या प्रवाहात गायब झाला. वारणा नदीचा प्रवाह खूप रुंद आहे. अशा परिस्थितीत तुषारला शोधणे कठीण झाले आहे. एनडीआरएफची टीम दिवसभर तुषारचा शोध घेत आहे.