पंकेश जाधव पुणे ब्यूरो चिफ 7020794626
गुन्हे शाखा युनिट-०४ पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- दिनांक ०७/०४/२०२३ रोजी फिर्यादी अमितकुमार कन्हैय्यालाल विश्वकर्मा वय २५ वर्षे, रा. कोपरआळी, लोहगांव पुणे हे एम आय टी कॉलेजच्या समोर हजर होते. वडगांव शिंदे रोड, लोहगांव पुणे येथे ४५ गुले भांडणे करीत होती. सदरची भांडणे फिर्यादी सोडवत आहेत अशा समज झाल्याने १) शंतनु शिवराज चाटे वय १९ वर्षे, रा. ज्ञान सागर पेट्रोल पंपाजवळ, साई गणेश सोसायटी, दुसरा मजला, वडगांव घेनंद रोड आळंदी पुणे. २) विधीसंघर्षित बालक रा. सदर ३) दिलीप बाबुराव हांगे रा. साई पार्क सोसायटी, ज्ञानसागर पेट्रोल पंपाजवळ, वडगांव घेनंद रोड, आळंदी पुणे यांनी फिर्यादीस अडवून धारदार शस्त्राने गंभीर दुखापत केली त्याबाबत विमानतळ पोलीस ठाणे पुणे येथे गु.र.नं. १७७ /२०२३ मा.द.पि. फलम ३२६, ३४१, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी अमितकुमार कन्हैय्यालाल विश्वकर्मा यांचेवर हॉस्पिटल येथे उपचार चालु असताना त्यांचा मृत्यु झाला. त्यानंतर सदर गुन्ह्यात भादवी कलम ३०२ या अंतर्भाव करण्यात आला..
सदर गुन्हयातील पाहीजे आरोपी नामे दिलीप बाबुराव होने रा. साई पार्क सोसायटी, ज्ञानसागर पेट्रोल पंपाजवळ, वडगांव घेनंद रोड, आळंदी पुणे हा गेल्या चार महीन्यापासून फरार होता. दि. ०५/०८/२०१३ रोजी दाखल गुन्हयाच्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट-०४ चे पथक विमानतळ पोलीस ठाणे हद्दीत समांतर तपास करत असताना पोलीस हवालदार संजय आढारी व पोलीस नाईक विनोद महाजन यांना त्यांचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, ” एम आय टी कॉलेजसमोर गांव शिंदेरोडवर एका इसमाचा खुन करणारा आरोपी दिलीप हांगे हा निवडुंगवाडी ता. जि. बीड येथे असलेबाबत माहीती मिळाली.
सदर बातमीच्या अनुषंगाने लागलीच वरिष्ठांच्या परवानगीने खाजगी वाहनाने गुन्हे शाखा युनिट ४. पुणे शहर कडील पथक निवडुंगवाडी, ता. जि. बीड येथे रवाना झाले. नेकनुर पोलीस ठाणे ता. जि… बीस येथे जावून स्थानिक पोलीसांच्या मदतीने निवडुंगवाडी ता. जि. बीड येथे दिलीप बाबुराव हांगे वय २१ વર્ષે રા. साई पार्क सोसायटी, ज्ञानसागर पेट्रोल पंपाजवळ, वडगांव घेनंद रोड, आळंदी पुणे .आरोपीकडे दाखल गुन्हयाच्या अनुषंगाने तपास करता त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. पाखल गुन्हयातील आरोपीस पुढील कारवाईकामी विमानतळ पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले.
सदरची उल्लेखनिय कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. रीतेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री संदीप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. अमोल झेंडे, मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-२ श्री. सतीश गोवेकर, पोलीस निरीक्षक श्री. गणेश माने यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जयदीप पाटील, पोलीस हवालदार संजय आढारी पोलीस हवालदार प्रविण भालचिम पोलीस नाईक विनोद महाजन यांनी केली आहे.

