माजी पंचायत समिती सभापती भास्कर तलांडे यांच्या नेतृत्वात राजाराम गावकऱ्यांच्या उपस्थित ठोकले टाळे.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्राम पंचायत कार्यालय राजाराम येथे गेल्या दोन वर्षापासून स्थायी ग्रामसेवक नसून ग्राम पंचायत कार्यालय पल्ले येथिल ग्रामसेवक पी. झाडे यांच्या विषयी कडे अतिरिक्त प्रभार म्हणून राजाराम येथे नियुक्त करण्यात आली आहे. मात्र पल्ले व राजाराम हे अंतर खुप लांबच असल्यामुळे सदर ग्रामसेवक राजाराम येते आठवड्यातून एक – दोनदा येत असतात व जास्त वेळ देत नसतात, तसेच राजाराम ग्राम पंचायत येते सरपंच व सदस्य यांच्या कालावधी संपले असून पंचायत समिती मधून प्रशासक निवड केली असून ते सुद्धा अनुउपस्थिती असतात त्यामुळे नागरिक विविध दाखले घेण्यासाठी अडचण निर्माण होत आहे.
तसेच गावातील विविध विकास कामे किंवा विविध योजनेचे माहिती मिळत नसून गावातील नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. राजाराम ग्राम पंचायत लोकसंख्यानी मोठी आहे.त्यामुळे ग्राम पंचायत राजाराम येथे स्थायी ग्रामसेवकांची नियुक्ती करण्यात यावी अन्यथा दिनांक 7 ऑगस्ट ला राजाराम ग्राम पंचायतीला कुलूप ठोकण्यात येईल अशा इशारा गावकर्यानी अहेरी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्याकडे निवेदन देवून केला होता. याबाबत उमुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे पंचायत विभाग गडचिरोली व मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांना प्रतिलिपि पाठवून माहिती दिली होती मात्र त्यांनी मागणी मान्य नाकारून राजाराम ग्राम पंचायतला ग्राम सेवक दिले नाही.
त्यामुळे अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे यांच्या नेतृत्वात माजी उपसरपंच संजय पोरतेट, पेसा अध्यक्ष दिपक अर्क, अरविंद परकीवार, पाटील, मूत्ता पोरतेट, मुन्ना वेलादी, रमेश पोरतेट, संतोष दुर्गे, तिरुपती दुर्गे, जीतु पंजलवार, चंद्रुशाही आलाम, महेश निष्टूरी, महेश सिडाम, राजू दुर्गे, विलास दुर्गे, अशोक शेंगामकर, भीमराव गोंगले सह अनेक गावकऱ्याच्या उपस्थित ग्राम पंचायत कार्यालयाला कुलुप ठोकण्यात आले.

