पंकेश जाधव पुणे ब्यूरो चिफ 7020794626
युनिट १ गुन्हे शाखा, पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- दि. ०४.०८.२०१३ रोजी पहाटेच्या सुमारास निरंकार अपार्टमेंट, दुसरा मजला, एफ सी रोड, गॉडेल कॉलनी पुणे येथील एका ऑफीसचे दार लोखडी पान्याचे सहाय्याने तोडून आत प्रवेश करून ऑफीस मधील एकूण ४ लैपटॉप चोरी केले बाबत शिवाजीनगर पोलीस स्टेशन गु.र.नं. १६३/२०२३ भा. द. वि. कलम ४५४. ४५७ ३८० गुन्हा दाखल झाला होता.
या दाखल गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना गुनिट कडील पोलीस अंमलदार यांनी सदर गुन्ह्याचे घटनास्थळाच्या आजुबाजुचे सीसीटिव्ही फुटेज पाहुन सीसीटिव्ही फुटेज मधील संशयीत आरोपीचा फोटो गुप्त बातमीदारास दाखवुन अधिक तपास करीत असताना पोलीस अमलदार दत्ता सोनवणे यांना त्याचे गोपनीय बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, सीसीटिव्ही फुटेज मधील संशयीत इसमासारखा दिसणारा इसम हा दारुवाला पुल चौक नाल्यालगत, सार्वजनिक शौचालया लगत, रास्ता पेठ पुणे येथे थांबलेला असुन त्याने अंगात काळे रंगाचा शर्ट घातलेला आहे वगैरे खात्रीशीर बातमी प्राप्त झालेने युनिट कडील पोलीस अधिकारी व अमलदार असे बातमीतील नमुद ठिकाणाचे थोडे अलिकडे आड बाजुला थांबुन व्यवस्थीत पाहणी केली असता २०.३० वा. चे सुमारास दारुवाला पुल चौक येथील सार्वजनिक शौचालया लगत असलेले नाल्याजवळ रास्ता पेठ पुणे येथे सीसीटिव्ही फुटेज मधील वर्णनाचा एक इसम थाबलेला दिसला. आमची व पंचाची खात्री झाल्याने लागलीच वरील नमुद पोलीस स्टाफचे मदतीने त्यारा साध्यात घेवुन पंचासमक्ष त्यास त्याचा पुर्ण नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव पत्ता मंगेश विजय चव्हाण, वय २६ वर्षे, रा. एस एम जोशी हॉल जवळ, नाल्यालगत, दारुवाला पुल चौक, रास्ता पेठ, पुणे ( फिरस्ता). असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे वरील नमुद दाखल गुन्ह्याचे अनुषंगाने अधिक विश्वासात घेवुन चौकशी केली असता त्याने सांगितले की, दाखल गुन्हयाची कबुली दिली असुन सदरचे लॅपटॉप एका पोत्यात भरुन तो रहात असलेले ठिकाणी नाल्यालगत एका कोप-यात ठेवलेले आहेत. वगैरे सांगुन सदरचे ठिकाण हे शेजारीच असल्याने सदर ठिकाणावरुन ३४,०००/- रु किं. घे एकुण ०४ लॅपटॉप पंचासमक्ष काढुन दिले आहेत. आरोपीस पुढील कारवाई कामी शिवाजीनगर पोलीस स्टेशन. पुणे यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मा. श्री रितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री संदिप कर्णिक सह पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री रामनाथ पोकळे अपर पोलीस आयुक्त, गुन्हे मा. श्री अगोल झेंडे पोलीस उप आयुक्त, गुन्हे पुणे शहर, मा. श्री सुनिल तांबे, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे-१, पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट १ कडील वपोनि शब्बीर सय्यद, सपोनि आशिष कवठेकर, पोउनि रमेश तापकीर पोलीस अंमलदार दत्ता सोनावणे, निलेश साबळे, आण्णा माने, अमोल पवार, आय्याज दड्डीकर, शंकर कुमार यांनी केली आहे.

