माजी पंचायत समिती सभापती भास्कर तलांडे व राजाराम गाव वासीयच्या मागणीला यश. ग्रामसेवकाची आदेश देताच कुलुप काढले.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्राम पंचायत कार्यालय राजाराम येथे गेल्या दोन वर्षापासून स्थायी ग्रामसेवक नसून ग्राम पंचायत कार्यालय पल्ले येथिल ग्रामसेवक श्री पी. झाडे यांच्याकडे अतिरिक्त प्रभार म्हणून राजाराम येथे नियुक्त करण्यात आली आहे. मात्र पल्ले व राजाराम हे अंतर खुप लांब ची असून सदर ग्रामसेवक राजाराम येते आठवड्यातून एक दोनदा येत असतात व जास्त वेळ देत नसतात, तसेच राजाराम ग्राम पंचायत येते सरपंच व सदस्य यांच्या कालावधी संपले असून पंचायत समितीमधून प्रशासक निवड केली असून ते सुद्धा अनुउपस्थिती असतात त्यामुळे नागरिक विविध दाखले घेण्यासाठी अडचण निर्माण होत आहे, तसेच गावातील विविध विकास कामे किंवा विविध योजनेचे माहिती मिळत नसून गावातील नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
राजाराम ग्राम पंचायत लोकसंख्यानी मोठी आहे. त्यामुळे ग्राम पंचायत राजाराम येथे स्थायी ग्रामसेवकांची नियुक्ती करण्यात यावी अन्यथा दिनांक 7 ऑगस्ट ला राजाराम ग्राम पंचायतीला कुलूप ठोकण्यात येईल अशा इशारा माजी सभापती भास्कर तलांडे व गावकऱ्यांनी अहेरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या कडे निवेदन देवून केली याबाबत उमुख्यकार्यकारी अधिकारी पंचायत विभाग गडचिरोली आणि मुख्यकार्यकारी अधिकारी जि. प. गडचिरोली यांना प्रतिलिपि पाठवून माहिती दिली होती. मात्र त्यांनी राजाराम ग्राम पंचायतला ग्राम सेवक दिले नाही.
त्यामुळे संतापाने अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे यांच्या नेतृत्वात माजी उपसरपंच संजय पोरतेट, पेसा अध्यक्ष दिपक अर्क, अरविंद परकीवार, पाटील मूत्ता पोरतेट, मुन्ना वेलादी, रमेश पोरतेट, संतोष दुर्गे, तिरुपती दुर्गे, जीतु पंजलवार, चंद्रुशाही आलाम, महेश निष्टूरी, महेश सिडाम, राजू दुर्गे, विलास दुर्गे, अशोक शेंगामकर, भीमराव गोंगले सह गावकरी यांच्या उपस्थित राजाराम ग्राम पंचायत ला कुलुप ठोकन्यात आले होते.
त्यामुळे प्रशासनाकडून मध्यस्थी म्हणून राजाराम चे पोलीस निरीक्षक एस.कसबेवाडा यांनी मध्यस्थी केले मात्र जेव्हा पर्यत स्थायी ग्रामसेवक येत नाही तेंव्हा पर्यंत कुलुप काढत नाही असे ठाम मत असल्याने संध्याकळी अहेरी पंचायत समितीचे कृषि विस्तार अधिकारी एस.बानईत यांनी स्थायी ग्रामसेवक म्हणून पोटावी यांना घेवून आदेश देत नियुक्ती दिली. त्यामुळे कुलुप काढण्यात आले असून माजी सभापती भास्कर तलांडे व गावकऱ्याच्या मागणीला यश आले आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

