मधुकर गोंगले, अहेरी तालुका प्रतिनिधी
गडचिरोली :- गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. जेव्हा एक पोलिस कर्मचारी आपल्याच पोलिस सहकाऱ्यांवर गोळीबार करत असेल तर ही शोकांतिका म्हणावी लागेल.
अशीच एक घटना एटापल्ली पासून जवळ असलेल्या आलदंडी मार्गावरून समोर आली. सकाळच्या सुमारास गस्तीवर असलेल्या शीघ्र कृती दलाच्या पथकातील एका पोलिस जवानाने आपल्याच पोलिस सहकाऱ्यावर बंदुकीने गोळीबार केला. यामुळं पोलिस दलाच्या सुरक्षिततेवरच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार गडचिरोलीतील एटापल्ली उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाच्या अखत्यारीत येत असलेल्या शीघ्र कृती दलाच्या पथकातील संतोष सिडाम या पोलिस जवानाने आपलाच पोलिस दलातील सहकारी असलेल्या विजय करमे या पोलिस जवानांवर आज सकाळच्या सुमारास बंदिकच्या सहय्याने गोळीबार केला. पोलिस दल गस्तीवर असतांना संतोष व विजय मध्ये वाद झाला व याचे पर्यवसान गोळीबारात झाले या घटनेत विजय करमे गंभीररित्या जखमी झाले असून त्याला तात्काळ हेलिकॉप्टरच्या माध्यमातून नागपुरातील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याच्या नागपुरातील रूग्णालयात उपचार सुरु असून सद्यस्थितीत त्या जवानांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास एटापल्ली पोलिस करीत आहे.