अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मो. नं. -9822724136
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर – 9 ऑगस्ट:- मणिपूर येथे महिलेवर अमानवीय कृत्य करणाऱ्या नराधमाना कठोर कार्यवाही करून फासी द्यावी व मनोहर भिडे यांनी महापुरुषांच्या बद्दल केलेले वक्तव्य कायदा,सुव्यवस्था भंग करून दंगली पेटविनारे आहे.या दोन्ही घटनेचा वंचित बहुजन आघाडी तर्फे तीव्र निषेध करित जिल्हाध्यक्ष विलास वाटकर यांच्या नेतृत्वात व पुर्व विदर्भ संयोजक भगवान भोंडे यांचा मार्गदर्शन मध्ये तहसील कार्यालय सावनेर समोर नारे निदर्शने करून उपविभागीय अधिकारी संपत खलाटे यांच्या मार्फत पंतप्रधान यांना निवेदन देण्यात आले. तसेच कायद्यानुसार योग्य ती कार्यवाही लवकरात लवकर व्हावी अशी मागणी करण्यात आली.
याप्रसंगी पक्षाचे जिल्हा व तालुका पदाधिकारी अजय सहारे, पंकज शेलारे, दिगांबर डोंगरे, प्रमोद बागडे, दादाराव लांजेवार, शांताराम ढोके, अरुण गजभिये, देवराव भांगे, मधुकर बागडे, विजय बागडे, संजय गहुकर, रत्नमालाताई रागासे, डॉ. सुधाकर कावळे, दीपक पाटील, वैभव येवले, अनिल नांदुरकर, अशोक मेश्राम, कमलेश सहारे, मृणाल भौतकर, लक्ष्मीकांत सोनटक्के, उत्तम कापसे, धनेश्वर ढोके, भीमराव सोमकुवर, सतीश जंगले, धर्मपाल मेश्राम व मनीष शेंडे उपस्थित होते.

