Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

वर्धा: चोरीची दुचाकी विकायला आला अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला, चौघांना अटक; 7 चोरीच्या दुचाकी हस्तगत.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 9, 2023
in Uncategorized
0 0
0
वर्धा: चोरीची दुचाकी विकायला आला अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला, चौघांना अटक; 7 चोरीच्या दुचाकी हस्तगत.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दुचाकी चोरीच्या घटना घडत आहे. त्यातच वर्धा येथील स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून पुलगाव येथून दुचाकी चोरून वर्ध्यात दुचाकी मोटर सायकल विकायला येणाऱ्या चोरट्यांच्या टोळीला बेड्या ठोकल्या आहे. ही कारवाई 7 ऑगस्ट रोजी दयालनगर परिसरातील रेल्वे प्रवेशद्वारासमोर करण्यात आली.

या मोटर सायकल चोरट्याचा टोळीतील कौशिक बिजेश तिवारी, राहुल दादाराव जाधव, रा. वडार झोपडपट्टी, गौतम कुंवरलाल मानेश्वर, रा. बोरगाव मेघे तसेच एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी अटक केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, पुलगाव परिसरात दुचाकी चोरींच्या घटना वाढल्या होत्या. त्यानुसार पोलिस अधीक्षक नुरूल हसन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला चोरीतील वाहनांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार चोरट्यांचा आणि दुचाकींचा शोध पोलिसांकडून कसोशीने घेतला जात होता. दरम्यान पोलिस पथकाला चोरीची दुचाकी विकण्यासाठी दयालनगर परिसरात चोरटे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दयालनगर परिसरात सापळा रचला असता एका दुचाकीवर दोन संशयित व्यक्ती बसलेले दिसून आले. पोलिसांनी त्यांची विचारपूस केली असता एकाने त्याचे नाव कौशिक तिवारी आणि दुसरा अल्पवयीन दोघही भीमलाइन पुलगाव असे सांगितले. दुचाकीबाबत विचारणा करून पोलिसी हिसका दाखवताच त्यांनी दुचाकी पुलगाव परिसरातून चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी समांतर तपास करून पुलगाव परिसरातून सात चोरीतील दुचाकी विविध ठिकाणाहून हस्तगत केल्या.

तसेच चोरीतील दुचाकी विक्री करण्यासाठी मदत करणाऱ्या राहुल दादाराव जाधव, रा. वडार झोपडपट्टी, गौतम कुंवरलाल मानेश्वर, रा. बोरगाव मेघे यांनाही अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस अधीक्षक नुयल हसन, अप्पर पोलिस अधीक्षक सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या निर्देशात सहायक पोलिस निरीक्षक संतोष दरेकर, पोलिस उपनिरीक्षक अमोल लगड, रामदास खोत, मनोज धात्रक, नरेंद्र पाराशर, संजय बोगा, विनोद कापसे, अक्षय राऊत, शिवकुमार परदेशी, गणेश खेवले यांनी केली.

Previous Post

वर्धा जिल्हातील आष्टी येथे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा कुटुंबांना मदतीचे वाटप.

Next Post

देशी बनावटीचे ०२ कटटे व ०४ जिवंत काडतुसे बाळगणा-या रेकॉर्डवरील गुन्हेगारास खंडणी विरोधी पथक – २ गुन्हे शाखा, पुणे शहर यांचेकडुन अटक

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
देशी बनावटीचे ०२ कटटे व ०४ जिवंत काडतुसे बाळगणा-या रेकॉर्डवरील गुन्हेगारास खंडणी विरोधी पथक – २ गुन्हे शाखा, पुणे शहर यांचेकडुन अटक

देशी बनावटीचे ०२ कटटे व ०४ जिवंत काडतुसे बाळगणा-या रेकॉर्डवरील गुन्हेगारास खंडणी विरोधी पथक - २ गुन्हे शाखा, पुणे शहर यांचेकडुन अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In