आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हात क्राईम ग्राफ मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे अनेक घटनेवरून दिसून येते आहे. त्यात वर्धा जिल्हा वेगवेगळ्या दोन हत्याकांडाने हादरला आहे. पुलगाव येथे दारूच्या उधारीतून दारू विक्रेता अकबर अली जब्बार अली याची हत्या करीत त्याचा मृतदेह अमरावती जिल्ह्यात चंद्रभागा नदीच्या पात्रात फेकून दिल्याची घटना समोर आली आहे.
पुनम गवारी, सागर गवारी याच्या घरी अकबर यांची ओळख होती त्याचे आरोपीच्या घरी येणे जाणे होते. या प्रकरणी करण्यात आलेल्या तक्रारीत अकबर व पूनमचे अनैतिक संबंध असल्याचे नमूद आहे. चार ऑगस्टला रात्री ते दोघे रेल्वे परिसरात आढळून आले होते. सकाळपर्यंत तो घरी न आल्याने त्याचा शोध सुरू झाला. शेवटी त्याचा मृतदेह सापडला. तो त्याच्या मित्राला पोलीसांनी दाखविल्यावर ओळख पटली.
दारू विक्रीच्या उधारीच्या पैश्यापोटी ही हत्या केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. यात अनिकेत वाघाडेसह नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
तर दुसऱ्या घटनेत वर्धा शहरातील ईतवारा परिसरात राहणाऱ्या मरियम शाह या 60 वर्षीय महिलेचा तलवारीने सपासप वार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली होती.
आरोपी सचिन किसन कांबळे हा मद्यधुंद अवस्थेत मृतक शाह यांच्या घरी घुसून शिवीगाळ करू लागला. मरियम व तिच्या पतीने धिरजला भडकविले म्हणून त्याचा राग होता. पती मेहबूब यास सचिनने घरातून खेचून तलवारीने वार केला. मात्र तो निसटून पळाला. तेव्हा आरोपीने मध्यस्थी करण्यास आलेल्या मरियमला तिचे केस ओढून खाली पाडले. तलवारीने तिच्या गळ्यावर सपासप चार घाव घातले. तिचा जागीच मृत्यू झाल्याचे पाहून सचिनने पळ काढला. अद्याप तो फरार आहे. या दोन हत्याकांडाने संपूर्ण वर्धा जिल्हा हादरून गेला आहे.

