मधुकर गोंगले, अहेरी तालुका प्रतिनिधी
अहेरी:- तालुक्यातील ग्रामपंचायत दामरंचा येथील आविसचे ग्रामपंचायत सदस्य साम्मा पडगा कुरसाम आणि आविसचे कार्यकर्ते ईरीया ईरपा कुळमेथे, मासा पेंटा सिडाम, वसंत गणपत कुरसाम इत्यादींनी आदिवासी विद्यार्थी संघाला सोडून, अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री धर्मराव बाबा आत्राम यांच्यावर विश्वास ठेवुन, आमदार बाबा आत्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी वरील आविस कार्यकर्ते राकाँ मध्ये प्रवेश करतांना, अहेरी पंचायत समितीचे माजी सदस्य राकेश पन्नेला, भांगारामपेठा येथील सामाजिक कार्यकर्ता श्री बाबुराव तोरेम, श्रीकांत मद्दीवार सावकार अहेरी इत्यादी उपस्थीत होते.