महाराष्ट्र संदेश न्युज प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पंढरपुर:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका वडिलांनी आपल्या मुलीच्या प्रेम विवाहाला विरोध केला म्हणून चक्क जन्म देणाऱ्या मुलीने आपल्या जन्मदात्या वडिलांना मारहाण केली. ही घटना सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात घडली आहे. या मुलीने आपल्या प्रियकराच्या मदतीने वडीलाना बेदम मारहाण केली आहे. साक्षी शाह असे त्या मुलीचं नाव असून असे पिढीत वडिलांचं महेंद्र शहा असे आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वडिलांनी आपल्या मुलीला प्रेम विवाहाला परवानगी न दिल्यानं मारहाण केल्याचे समोर आले. मंगळवारी रात्री साडे दहाच्या सुमारास माढ्यातील प्रसिद्ध व्यापारी महेंद्र शहा हे शेटफळ येथून आपल्या मुलीला माढ्याकडे घेऊन येत होते. यावेळी वडाचीवाडी गावाजवळ बाथरुमसाठी गाडी थांबवली. यावेळी अज्ञातांनी शहा यांना जबर मारहाण सुरू केली. यात ते जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सोलापुरातील रुग्णालयात दाखल केले.
दुसऱ्या दिवशी सकाळी मुलगी साक्षी हिने पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी यावेळी घटनेची चौकशी केली. पोलिसांनी संशयीतांना अटक केली. यावेळी पोलिसी खाक्या दाखवताच संपूर्ण कटाचा उलघडा झाला.
प्रेम विवाहाला वडिलांचा विरोध होता त्यांना जायबंदी करून विवाह करण्याचा कट रचला आणि त्यानुसार हे कृत्य केले असे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी साक्षी शहा,चैतन्य कांबळे,आतिश लंकेश्वर,रामा पवार,बंडू उर्फ आनंद जाधव ,मयूर चंदनशिवे असे अटक केलेले आरोपींची नाव आहेत.