उषाताई कांबळे, सांगली शहर प्रतिनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- राज्यात मुली आणि महिलांवर अत्याचाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यात सांगली येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणात सांगली जिल्हा व अतिरिक्त सह सत्र न्यायाधीश यांनी महत्वपूर्ण निकाल परित केला असून अत्याचार करणाऱ्या नराधमांस राजेबाकसर राजेसाब पिरजादे वय 59 वर्ष, जुना बुधगाव रोड, वाल्मिकी आवास योजना, सांगली यास दोषी ठरवून वीस वर्षांची शिक्षा ठोकावली आहे.
अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा आरोप असलेल्या आरोपी राजेबाकसर राजेसाब पिरजादे याला सांगली जिल्हा व अतिरिक्त सह सत्र न्यायाधीश डी. एस. हातरोटे यांनी ही शिक्षा सुनावली आहे. यावेळी त्याला 25 हजार दंड लावण्यात आला असून ती रक्कम पीडित मुलीस देण्याचा आदेशही दिला. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील आरती देशपांडे- साटविलकर यांनी काम पाहिले.
या खटल्याची हकीकत अशी की, फिर्यादी यांच्या घरी आरोपी राजेबाकसर पिरजादे हा बऱ्याच वर्षांपासून सुतारकाम करीत होता. त्यांच्या घरी तो किरकोळ दुरुस्तीची कामे करीत होता. त्यामुळे फिर्यादी आणि आरोपीची चांगली ओळख होती. कामाच्या निमित्ताने आरोपी पिरजादे याचे फिर्यादी यांच्या घरी वारंवार येणे-जाणे होते. 16 ऑक्टोबर
2019 रोजी फिर्यादीच्या पतीने कामानिमित्त आरोपी पिरजादे यास घरी बोलावले. त्याला काम सांगून ते मुलाला आणण्यासाठी बाहेर गेले. त्यावेळी घरामध्ये फिर्यादी आणि 6 वर्षीय मुलगी असे दोघेच होते. फिर्यादी स्वयंपाकघरात स्वयंपाक करीत होत्या. आरोपी पिरजादे बाहेरच्या खोलीत काम करीत होता. पीडित मुलगी खोलीत चेंडूने खेळत होती. खेळताना आरोपीच्या जवळ पडलेला चेंडू आणण्यासाठी मुलगी गेली असता आरोपी पिरजादे याने तिच्यावर अत्याचार केला. ही घटना मुलीने आईला सांगितली. फिर्यादींनी पतीस तातडीने बोलवून घेतले व आरोपी पिरजादे यास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
याबाबत पोलिसांनी तक्रार दाखल करून आरोपी विरुद्ध ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल करून. हा खटला न्यायालयात सुनावणीस आला असता सरकारी पक्षातर्फे सात साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयात आलेल्या साक्षी व पुरावे ग्राह्य धरून न्यायमूर्तींनी आरोपी राजेबाकसर पिरजादे यास 20 वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. या प्रकरणाचा तपास सांगली शहर पोलिस स्टेशनचे निरीक्षक अजय सिंदकर यांनी केला. त्यांना पैरवी कक्षातील सीमा धनवडे, सुनीता आवळे, रेखा खोत, पी. जे. डांगे यांनी सहकार्य केले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

