श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- बीड जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीत ऍड प्रशांत राजापूरकर यांचे संपूर्ण पॅनल बहुमताने विजयी झाले.चुरशीच्या या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
आज झालेल्या वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्ष- ॲड.प्रशांत सुधाकरराव राजापूरकर, उपाध्यक्ष- ॲड.दादासाहेब सुंदरराव तांगडे,सचिव -ॲड.एकनाथ गोविंदराव काकडे, सहसचिव-ॲड. विठ्ठल भारतराव शेळके, कोषध्यक्ष- ॲड. आनंद दिलीपराव कुलकर्णी, ग्रंथपाल- ॲड शेख इम्रान खाजा, महिला प्रतिनिधी- ॲड. सायली सुनील सुतार हे बहुमताने विजयी झाले.
ऍड राजापूरकर यांच्या पॅनल मधील उमेदवारांना शंभर ते दीडशे मताधिक्य मिळाले. या निवडीनंतर पॅनल च्या विजयी उमेदवारांनी एकच जल्लोष केला.