निलेश पत्रकार, वणी तालुका प्रतिनिधी
वणी वरोरा मार्गावरून एक खळबळजनक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. वणी वरोरा मार्गावरील वर्धा नदीच्या पुलाभोवती लागून असलेल्या लोखंडी कठड्याला एक युवक गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यामुळे सर्विकडे एकच खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, आज पहाटेच्या सुमारास वणी वरोरा मार्गावरून जाणाऱ्या वाटसरू वाहन चालकांना एक युवक टायरमध्ये वापरण्यात येत असलेल्या ट्यूबच्या साहाय्याने वर्धा नदीच्या पुलाभोवती सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या कठड्याच्या लोखंडी पाईपला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला. याची माहिती तात्काळ स्थानीक पोलिसाना देण्यात आली.
वर्धा नदीच्या पुलावरील सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या लोखंडी कठड्याला ट्यूबने लटकलेल्या अवस्थेत युवकाचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आलेल्या युवकाचे नाव तेजस मोगरे असून. त्याच्या आत्महत्या करण्यामागचे कारण अद्याप कळू शकले नाही. या नदीच्या पुलावर एक दुचाकी बेवारस उभी असून ती या युवकाचीच असावी असा तर्क लावल्या जात आहे. मृतदेहा जवळ उभी असलेल्या या दुचाकींचा क्रमांक MH-34 -BL 5163 आहे.
पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह उर्वरित तपासणी व शवविच्छेदना करिता रुग्णालयात पाठवला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे. त्यानंरत या युवकाच्या आत्महत्येचे कारण समोर येणार.