रुग्ण सेवा हा जिव्हाळ्याचा प्रश्न – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर
देवेंद्र सिरसाट, हिंगणा नागपुर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- रोटरी क्लब ऑफ नागपूर ईशान्य व मारवाडी युवा मंच नागपूर यांच्या संयुक्त विद्यामाने मेडिकल इक्विपमेंट बँकचे लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर विपीन ईटकर यांच्या हस्ते हा लोकार्पण करण्यात आले.
स्वतः पेशाने डॉक्टर असल्यामुळे आणि तेही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून शिक्षण घेऊन आल्यामुळे रुग्णसेवा हा माझ्यासाठी जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. गरीब रुग्ण सहाय्यक साधनांकरिता किती वन वन फिरतात, उपचाराकरिता शेती विकावी लागते हे सगळं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात असताना बघितलं आहे त्यामुळे रुग्णसेवा हा माझ्यासाठी काळजाचा विषय आहे असे जिल्हाधिकारी डॉक्टर विपीन ईटकर रोटरी क्लब ऑफ नागपूर ईशान्य व मारवाडी युवा मंच नागपूर यांच्या संयुक्त विद्यामाने मेडिकल इक्विपमेंट बँकच्या लोकार्पण कार्यक्रमात बोलले पुढे बोलताना जिल्हाधिकारी यांनी या मेडिकल इक्विपमेंट बँकेच्या माध्यमातून गरजू रुग्णांना आधार मिळेल असे प्रथम व्यक्त केली. कार्यक्रमाला गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अर्चित चांडक, नागपूर महानगराचे संघचालक राजेश लोया, रणजीत सिंग खुराना, मारवाडी युवा मंचचे प्रदेशाध्यक्ष कैलाश राठी, विदर्भ प्रमुख महेश बंग, सचिन अग्रवाल,शरद टावरी, पराग लक्षरे, कन्हैया मंत्री, हेमंत शर्मा प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाला डॉ. सुधीर गुप्ता, प्रकाश नागपूरे, प्रकाश इटंनकर, प्रेम लूनावत, डॉ.संजय उगेमुगे, राजाभाऊ टाकसाळे ,संजय पालीवाल, सुधीर बाहेती, अजय मल, शरद राठी, डॉ. प्रशांत राठी, डॉ.मनीष बाहेती, डॉ. जगदीश कोठारी, राजू अग्रवाल, डॉ. प्रशांत राठी, परेश चांडक, अखिल मंत्री,अनिल मंत्री, विश्वजीत भगत, किशोर पालीवाल, दीपक अग्रवाल, मनियार आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरद टावरी यांनी केले. संचालन डॉ. चारु बाहेती व डॉ.प्रधनया लड्ढा यांनी तर आभार कन्हैया मंत्री यांनी मानले