Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

बिपीन मिलिंद मापारी (टोळी प्रमुख) व त्याचे इतर ०३ साथीदार यांचे विरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई

पंकेश जाधव by पंकेश जाधव
August 11, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
बिपीन मिलिंद मापारी (टोळी प्रमुख) व त्याचे इतर ०३ साथीदार यांचे विरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चिफ 7020794626

पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दि. ३१/०३/२०२३ रोजी फिर्यादी हे त्यांचे मित्रासोबत फोनवर बोलत असताना आरोपी नामे ऋषि उर्फ भावड्या धिवार, निरज सुनिल खंडागळे, बिपिन मिलिंद मापारी, दौलत पिराजी आगम असे फिर्यादी यांचे जवळ येवुन स्वप्निल उर्फ बाबा जगताप याच्या कडे रागाने का बघत असतो. तो आमचा मित्र आहे तुला खुप माज आला आहे का असे म्हणुन त्यांनी फिर्यादीस शिवीगाळ करुन, लाथा-बुक्क्यांनी मारहाण करुन कसलेतरी धारदार हत्याराने फिर्यादीचे डोक्यात व पाठीवर मारून, त्यांना गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला, म्हणून पर्वती पोलीस स्टेशन येथे पर्वती (दत्तवाडी) पोलीस स्टेशन गु.र.नं. ८८/२०२३. भा. दं. वि. क. ३०७,३२६.३२३, ५०४,३४, आर्म अॅक्ट ४ (२५). म.पो.अधि. कलम ३७ ( १ ) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान सदरचा गुन्हा हा आरोपी नामे १) बिपीन मिलिंद मापारी, वय २४ वर्षे, रा. घर नं.६९७, लायन्स क्लब, दत्तवाडी पुणे (टोळी प्रमुख) २) त्रषिकेश ऊर्फ भावडया बबन धिवार, वय २१ वर्षे, रा. घर नं.८६०, दत्तवाडी पुणे ३) निरज सुनिल खंडागळे, वय २० वर्षे, रा. सदर ४) विशाल ऊर्फ दौलत पिराजी आगम, वय ३४ वर्षे, रा. सदर (टोळी सदस्य) यांनी केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे.

वरील नमुद आरोपींकड़े सखोल तपास केला असता व नमुद आरोपीचे पुर्व रेकॉर्डची पाहणी करता यातील आरोपी नामे बिपीन मिलिंद मापारी (टोली प्रमुख) याचे विरुध्द oi गुन्हे व ऋषिकेश धिवार याचेवर ०५ गुन्हे दाखल असून त्यांनी बेकायदेशीर मार्गाने स्वतःसाठी किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीसाठी इतर फायदा मिळविण्याच्या उद्देशाने संघटित गुन्हेगारी संघटनेचा सदस्य म्हणून किंवा संघटनेच्या वतीने एकटयाने किंवा संयुक्तपणे हिंसाचाराचा वापर करून किंवा हिंसाचार करण्याची धमकी देवून किंवा धाकदपटशा दाखवून किंवा जुलुम जबरदस्ती करून किंवा अन्य अवैध मार्गाने आपली बेकायदेशीर कृत्य चालु ठेवून संघटना किंवा टोळी म्हणुन संयुक्तपणे संघटित गुन्हेगारी कृत्य करणारी टोळी तयार केली असुन वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करुनही त्यांनी पुन्हा-पुन्हा गंभीर स्वरुपाचे गुन्हे केलेले आहेत .सदर टोळीने मागील १० वर्षात खूनाचा प्रयत्न घातक हत्यारांनी किंवा साधनांनी इच्छापुर्वक जबर दुखापत पोचवणे, दुखापत करणे, बेकायदेशीर जमाव जमवणे, बेकायदेशीररित्या शस्त्र जवळ बाळगणे इत्यादी प्रकारचे गुन्हे केल्याचे निदर्शनास आले आहे. सदरचे गुन्हे हे अवैध मार्गाने स्वतःसाठी व इतरांसाठी गैरवाजवी इतर फायदा मिळविण्यासाठी टोळीचे वर्चस्वासाठी व दहशत कायम ठेवण्यासाठी सातत्याने चालु ठेवल्याचे निषन्न होत आहे.

दाखल गुन्हयामध्ये महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३ (१)(ii). ३(४) प्रमाणे कलम वाढविण्यासाठी सदर मान्यता मिळणे बाबतचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर श्री जयराम पायगुडे यांनी मा.पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-०३, पुणे शहर, श्री. सुहेल शर्मा यांचे मार्फतीने मा. अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री प्रविणकुमार पाटील यांना सादर केला होता. सदर प्रकरणी छाननी करून पर्वती (दत्तवाडी) पोलीस स्टेशन गु.र.नं.८८/२०२३ भा.दं.वि. क.३०७,३२६.३२३, ५०४,३४, आर्म अॅक्ट ४ (२५) म.पो.अधि. कलम ३७(१) सह १३५ या गुन्हयात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३ (१) (ii). ३ (४) या कलमाचा अंतर्भाव करण्याची मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री प्रविणकुमार पाटील यांनी पूर्व मान्यता दिलेली आहे.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास मा. सहा. पोलीस आयुक्त सिंहगड रोड, पुणे शहर श्री. अप्पासाहेब शेवाळे हे करीत आहेत.

सदर कारवाई मा. पोलीस आयुक्त पुणे शहर, श्री रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर श्री. संदीप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग श्री. प्रविणकुमार पाटील, पोलीस उप- आयुक्त, परिमंडळ – ०३ श्री. सुहेल शर्मा, मा. सहा. पोलीस आयुक्त, सिंहगड रोड, पुणे शहर, श्री. अप्पासाहेब शेवाळे यांचे मार्गदर्शनाखाली पर्वती पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जयराम पायगुडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. विजय खोमणे, पोलीस उप-निरीक्षक जगदाळे, पोलीस अंमलदार, दिपक लोधा, महेश चौगुले, गोरख नादगुडे यांनी केली आहे.

मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री रितेश कुमार यांनी कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्राणांवर बारकाईने लक्ष देवुन शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व नागरीकां मध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवुन, गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्या बाबत सर्व पोलीस अधिकारी व अमलदार यांना निर्देश देण्यात आलेले आहेत, त्यांचे मार्गदर्शनाखाली मकोका अंतर्गत केलेली ही ४५ वी कारवाई आहे.

Previous Post

गडचिरोली जिल्हात 7 महिन्याच्या गर्भवती महिलेवर सामूहिक अत्याचार, दोन नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

Next Post

मेरी माटी मेरा देश या अभियाना अंतर्गत लायन्स क्लब आणि पोलीस स्टेशन सावनेर यांचे विद्यमाने आरोग्य तपासणी शिबिर संपन्न.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
मेरी माटी मेरा देश या अभियाना अंतर्गत लायन्स क्लब आणि पोलीस स्टेशन सावनेर यांचे विद्यमाने आरोग्य तपासणी शिबिर संपन्न.

मेरी माटी मेरा देश या अभियाना अंतर्गत लायन्स क्लब आणि पोलीस स्टेशन सावनेर यांचे विद्यमाने आरोग्य तपासणी शिबिर संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In