श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- एकीकडे सर्वत्र करोना महामारीने संपूर्ण जग हैराण होते. डॉक्टर आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णाचे प्राण वाचवत होते. त्यात बीड जिल्हा रुग्णालयात काही कर्मचारी ही संधी साधून आपली खिशे गरम करून कोरोडो रूपये लुटत होते. या कोरोना काळात हे कर्मचाऱ्याने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावावर बोगस फार्म कंपनी दाखवून कोट्यवधी रुपयांचे साहित्य अन औषध खरेदी करत भ्रष्टाचार करणारे तानाजी ठाकर, रियाज शेख आणि एजाज शेख यांनी जिल्ह्याबाहेर बदली झाली आहे.
बीड जिल्हा रुग्णालयामध्ये कोणतेही जिल्हा शिल्लक चिकित्सक असले तरी स्टोअर सांभाळण्याची जबाबदारी औषध निर्माण अधिकारी आदिनाथ मुंडे, तानाजी ठाकर, रियाज शेख आणि एजाज शेख यांच्यावरच असायची या चौघांनी मिळून बीड येथील जिल्हा रुग्णालय आणि शासनाची अक्षरशः कोट्यावधी रुपयांची लूट केली आहे.
कोरोना महामारीच्या काळात औषध निर्माण अधिकारी पदावर बसलेल्या तानाजी ठाकर आणि रियाज शेख या दोघांनी तर तत्कालीन सी एस थोरात, गीते, साबळे या सगळ्यांना आपल्या खिशात घालत करोडो रुपये छापले गणेश बांगर डॉक्टर जयश्री बांगर राजरतन जायभाय यांच्या माध्यमातून स्वतःच्या आणि नातेवाईकांच्या नावावर बोगस कंपन्या काढून या चौघांनी शंभर ते दीडशे कोटी रुपये छापले तानाजी ठाकर आणि रियाज शेख या दोघांना तर एवढा माज चढला होता की पत्रकार असो शासकीय अधिकारी असो किंवा चौकशी समिती कोणालाही ते मोजत नव्हते लातूर आणि मुंबई येथील चौकशी पथकाला अपुरे कागदपत्र देत चौकशीत असहकार्य केल्याचा ठपका देखील यांच्यावर समितीने ठेवला होता दरम्यान बोगस नोकर भरती प्रकरणात जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे यांचे निलंबन झाल्यानंतर ठाकर रियाज आणि एजाज यांच्यावरही कारवाई होणार हे निश्चित होते
दरम्यान तानाजी ठाकर याची उस्मानाबाद स्त्री रुग्णालय येथे तर रियाज शेख यांची औसा येथे तर एजाज शेख यांची कळंब येथे तडकाफडकी बदली झाली आहे दरम्यान न्यूज अँड व्युज च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऑक्सीजन प्लांट खरेदी आणि कोरोना काळातील औषध खरेदी प्रकरणात येत्या आठवडाभरात ठाकर आणि रियाज यांचे निलंबन होणार आहे.

