आरोग्य सुविधेच्या दृष्टीने हिंगणघाट तालुका माघारलेला, नागरिकांची होत आहे हेळसांड.
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट: १२ ऑगस्ट:- हिंगणघाट येथे शासकीय मेडिकल कॉलेजला मंजुरी देण्यात यावी या मागणी करिता माजी आमदार प्रा.राजू तिमांडे व माजी नगराध्यक्ष पंढरीनाथ कापसे यांनी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या भेट घेऊन संपूर्ण माहिती चर्चे दरम्यान दिली व आज पर्यंत मेडिकल कॉलेजसाठी झालेल्या आंदोलनाच्या संपूर्ण लेखाझोक्याची फाईल तयार करून त्यांना सुपूर्द केली त्यावेळी त्यांनी या प्रश्नाला वाचा फोडून न्याय देण्याचे आश्वासन दिले तसेच काँग्रेस पक्षाचे विधानसभा विरोधी पक्ष नेते पदी विजय वडेट्टीवार यांची निवड झाल्याबद्दल सुती फाला त्यांच्या गळ्यामध्ये टाकून स्वागत केले व अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
नुकत्याच काही दिवसा अगोदर संघर्ष समितीच्या वतीने दिनांक २४ व २५ जुलै २०२३ रोजी आझाद मैदान मुंबई येथे दोन दिवस धरणे आंदोलन केल्याने मुंबई पावसाळी अधिवेशनामध्ये हिंगणघाट मेडिकल कॉलेजच्या प्रश्न विधानसभेत गाजला होता.
वर्धा येथे सावंगी व सेवाग्राम या ठिकाणी दोन वैद्यकीय महाविद्यालय असून हिंगणघाटच्या सभोवतालच्या परिसरात आरोग्य सेवेचा अभाव आहे. हिंगणघाट शहराची लोकवस्ती दीड लाखाच्या वर असून पोहणा, वडनेर, शेकापूर (बाई), कानगाव, अल्लीपूर, सावली वाघ, वाघोली सर्कलचा ग्रामीण भाग जोडला गेलेला आहे. समुद्रपूर तालुक्याचा संपूर्ण ग्रामीण भाग जाम सर्कल, मांडगाव सर्कल, कांडळी सर्कल, गिरड सर्कल, कोरा सर्कल, नंदोरी सर्कलचा परिसर हिंगणघाट शहराला लागून आहे. सेलू तालुक्यातील सिंदी (रेल्वे), हमदापुर सर्कलचा ग्रामीण भाग जवळ आहे.
हिंगणघाट मतदार संघातील शहरी आणि ग्रामीण भागाचा विचार केला असता लोकसंख्या जवळपास साडे पाच ते सहा लाख आहे. हिंगणघाट शहराला राळेगाव तालुक्यातील आदिवासी भाग, यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर-पांढरकवडा, वणी तालुक्याचा संपूर्ण परिसर लागून आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुका, चिमूर तालुका हिंगणघाट शहराला लागून आहे. नागपूर जिल्ह्यातील उमरेड तहसीलचा संपूर्ण भाग हिंगणघाट शहराला लागू आहे.
हिंगणघाट शहरातून नॅशनल हायवे नं.०७ (४४) नागपूर ते हैदराबाद मार्ग कन्याकुमारी रोड जात आहे भौगोलिक दृष्ट्या सर्वांगीण विचार केला असता हिंगणघाट शहराला लागून आंध्रप्रदेश, तेलंगणा राज्याचा भाग लागून आहे. वर्धा ते बल्लारशा ते आंध्रप्रदेश रेल्वे मार्ग हिंगणघाट शहरातून जात आहे आंध्रप्रदेशचे ते चंद्रपूर ते नागपूर हायवे जाम चौरस्ता लागून असून हिंगणघाट शहराला लागून आहे.
हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात शासनाने ४०० बेडची परवानगी मंजुरी प्रदान केली असून हिंगणघाट ला शासकीय मेडिकल कॉलेजला मंजुरी देण्यात कोणतीही अडचण नाही तसेच उपजिल्हा रुग्णालयात जागा सुद्धा उपलब्ध आहे.
हिंगणघाट येथे शासकीय मेडिकल महाविद्यालयला परवानगी देण्यासंबंधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांनी भेट घेतली असता खासदार शरद पवार यांनी राज्य सरकारला हिंगणघाट येथे मेडिकल महाविद्यालय मंजुरी देण्यासंबंधी पत्र पाठवले तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची सुद्धा भेट घेऊन निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
वरील सर्व मुद्दे माजी आमदार प्रा.राजू तिमांडे व माजी नगराध्यक्ष पंढरीनाथ कापसे यांनी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या लक्षात आणून देत हिंगणघाट येथे शासकीय मेडिकल कॉलेज देण्यासंबंधीची मागणी भेटी दरम्यान केली आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348