युवराज मेश्राम, विदर्भ ब्युरो चीफ नागपुर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर :- जिल्हातील काटोल येथे सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला नरेन्द्र डोंगरे अध्यक्ष पीपल्स रिपब्लिकन पार्टी नागपुर जिल्हा याचे नेत्वूत्वात सर्वपक्षीय जन आक्रोश सविधान बचाव मार्च काढण्यात आला. अध्यक्षस्थानी राहुल देशमुख होते. काटोल पंचायत समिती सभापती संजय डांगोरे, उपसभापती पंचायत समिती काटोल निशिकांत नागमोते, काँग्रेसचे नेते पुरुषोत्तम काकडे, आरपीआयचे नेते भीमराव बनसोड, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा नेते संजय खांडेकर, गणेश चन्ने राका, आशीष जयस्वाल प्रहार, दिगम्बर डोगरे, मनोहर कौरति, अनिल परतेती, पवन पेन्दाम, पुरूषोंत्तम इरपाची, संदीप वंजारी, तानबा शिन्गारे, सुरेश देशभ्रतार, बलवंत नारनवरे, संजय गायकवाड़, कृषी उत्पन्न बाजार समिती नरखेडचे संजय बडोदेकर, तुकाराम देशभ्रतार सह हजारोंच्या संख्येने नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते.
मणिपुरचा प्रकार हा सरकार प्रायोजित असावा म्हणूण मणिपुर सरकारचा निषेध करण्यात आला, सरकारच्या निषेध करीत यावेळी जोरदार घोषणाने परिसर दुमदुमून गेलेला होता. मणिपूर सरकार बर्खास्त करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. थोर पुरुषांची अवहेलना करणाऱ्या देशद्रोही, समाजद्रोही संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी याचा जाहीर निषेध करण्यात आला.
मणिपुर मधे झालेला हिंसाचार, खुनी हल्ले , बल्लात्कार, आदीवासी वर केलेले अमानुश हल्ला करून खुन करण्यात आले. याचा निषेध करण्यात आला. दलित आदिवासी वर होणारे हल्ले थांबावेत अन्यथा दलित, आदिवासी, ओबीसी समाज हा पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. दिवसेना दिवस या देशांमध्ये लोकशाही ही लोप पावत असून आज सर्व तरुण मंडळींनी जागे होण्याची गरज आहे असे यावेळी सांगण्यात आले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

