अक्षय जाधव सातारा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन सातारा:- वाई येथील बस स्थणकवर आज दुपारी दीडच्या सुमारास एस टी बसच्या चाकाखाली १३ वर्षीय विद्यार्थीनी चिरडल्याने जागीच ठार झाली. श्रावणी विकास आयवळे ( रा. सुलतानपूर, ता. वाई, ) असे मृत विद्यार्थीनीचे नाव असून टी त. ल. जोशी विद्यालयात ७ वी मध्ये शिकत होती. वाई बालेघर गाडी क्र. एम एच १४ बी टी ०४९६ ही बस बस्थाणकवर फलाटाला लागत असताना गाडीमध्ये शिरण्यासाठी विद्यार्त्यांनी एकच गर्दी केली होती.
यावेळी श्रावणी आयवळे ही विध्यार्थीनी गाडीच्या मागच्या बाजूस पडली. यावेळी गाडी मागे येत असल्याने तिचे डोके गाडीच्या चाकाखाली चिरडले.