कन्हान येथे झालेल्या केंद्रीय कलाकार परिषदेश घोषणा.
संदिप सुरडकर नागपुर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- विदर्भ शाहीर कलाकार परिषद तर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरुपूजा अण्णाभाऊ साठे जयंती व दिवंगत धर्मदासजी भिवगडे यांचा द्वितीय स्मृतिदिन निमित्त कुलदीप सभागृह कन्हान येथे खडीगंमत, भारुड, गोंधळ, नाट्य, कीर्तन, भारुड व प्रबोधनाचा कार्यक्रम व मेळावा हजारो कलावंताच्या उपस्थित घेण्यात आला. या कार्यक्रमाचे उदघाटक महाराष्ट्राचे माजी मंत्री राजेंद्रजी मुळक हे होते. तर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ रश्मीताई बर्वे, नरेशजी बर्वे, पर्यटकमित्र चंद्रपाल चौकसे व नगरसेवक शंकरराव चहांदे हे प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले होते.

यावेळी माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी उद्घाटनिय भाषणांमध्ये कलावंताच्या समस्या सोडविण्या करता आम्ही नेहमी कलावंताच्या पाठीशी होतो आणि राहू, असे सांगून ज्येष्ठ पत्रकार युवराज मेश्राम यांना शाल श्रीफळ व प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्याच प्रमाणे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विदर्भ शाहीर कलाकार परिषद नागपूर जिल्ह्याच्या प्रचार व प्रसार प्रमुख पदी नियुक्त केल्याचे पत्र प्रदान करण्यात आले.
युवराज मेश्राम 25 ते 30 वर्षापासून पत्रकारीता, सामाजिक, धार्मिक, राजकीय व सांस्कृतिक कार्य करत आहे. ते महाराष्ट्र संदेश न्युज चे विदर्भ ब्युरो चीफ म्हणून कार्य करत असताना जनतेच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करत आहेर. गेल्या पंचवीस वर्षापासून ते पत्रकारिता करीत असतानाच, स्वतःचे विदर्भ पत्रिका नावाचे साप्ताहिक सुरू केले. आज दैनिक महासागरचे ते तालुका प्रतिनिधी असून स्टार महाराष्ट्र न्यूज चैनल चे जिल्हा प्रतिनिधी व महाराष्ट्र संदेश न्यूज चैनल चे विदर्भ ब्युरो चीफ आहेत, तरी कलावंताच्या समस्याला वाचा फोडण्यासाठी व कलावंताचे प्रश्न पेपरच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून शासन दरबारी पोहोचण्याकरता, विदर्भ शाहीर कलाकार परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष मनीषजी भिवगडे कार्याध्यक्ष अलंकारजी टेंभूर्णे व जिल्हाध्यक्ष दयालजी कांबळे यांनी त्यांची नियुक्ती विदर्भ शाहीर कलाकारच्या प्रचार व प्रमुख पदी केलेली आहे.
यांच्या नियुक्ती बद्दल विदर्भ शाहीर कलाकार परिषदेचे जिल्हा सरचिटणीस अरुण भाऊ वाहने, महिला तालुका प्रतिनिधी मायाताई गणोरकर, पत्रकार संजय खांडेकर, पुरुषोत्तम डांगोरे, ज्ञानेश्वर तायवाडे, यादवराव कानोलकर, पुरुषोत्तमजी निघोट, बापूराव धनगरे, शंकर श्रीखंडे ,रामेश्वर दंडारे , रामदास मानेराव, नथुजी नागमोते, रूपचंद उमाळे, दिवाकर चौधरी, विठ्ठल नेरकर, उर्मिलाताई वाडी यांनी त्यांच्या अभिनंदन केले आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

