हनिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मोबा 9764268694
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- तालुका क्रीडा संकुल, विसापूर, बल्लारपूर येथे क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूर तालुका क्रीडा समिती, बल्लारपूर च्या अंतर्गत तालुका स्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धा संपन्न झाली.
या स्पर्धेचे उद्घाटन माजी अध्यक्ष वन विकास महामंडळ चंदनसिंह चंदेल, माजी क्रीडा संयोजक जगदीश गुरपूडे, अशोक कांबळे, अरुण टोंगे, जूम्मन रीझवी, रोटरी क्लब बल्लारपूरचे अध्यक्ष राहुल वरू, प्रफुल चरपे, पंच उमेश सहारे, चेडे, प्रमोद रामिल्ला याच्या उपस्थितीत या स्पर्धेचे उद्घाटन संपन्न झाले.

या स्पर्धेत अंडर 14, अंडर 17, अंडर 19 मुले/मुली या वयोगटात या प्रत्येक गटात पाच – पाच विद्यार्थी यांची जिल्हापातळी करिता निवड करण्यात आली. या स्पर्धेत एकूण 160 विद्यार्थ्यांनी भाग घेतला सदर आयोजन व नियोजन किशोर मोहूर्ले सर तालुका क्रीडा संयोजक बल्लारपूर यांच्या सहयोगाने पार पडले. यावेळी विविध शाळेचे क्रीडाशिक्षक गुलाम अहमद, रोहित शर्मा, भाग्यश्री मेश्राम, रमेश नातरकी, योगिता भोयर, स्वप्निल डंबारे, प्रणिता, प्रभुदास सर. विवेक सर, शबाना मॅडम, मंजुषा मॅडम आदींची उपस्थिती मध्ये सदर स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

