संदिप सुरडकर, नागपुर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे येथील हुडकेश्वर पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या बहादूरा येथील एका पतीने क्षुल्लक वादातून आपल्या पत्नीच्या डोक्यावर सिलिंडरने हल्ला करून आपल्याच पत्नीची निर्घृण खून केला. ही खळबळजनक घटना रविवारी दिनांक 13 ऑगस्टला मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास उघडकीस आली. यावेळी आरोपी पतीने हुडकेश्वर पोलीस ठाण्यात येत आत्मसमर्पण केले.
समीर अन्सारी याचा फेब्रिकेशनचा व्यवसाय आहे. सात वर्षांपूर्वी मोहम्मद अन्सारी व मृतक नायर अन्सारी खान यांचे लग्न झाले होते. हे कुटुंब मूळचे गोंदिया येथील रहिवासी आहे. शफी हा नागपुरात बहादूरा येथे स्थायिक झाला. नायरा यांना शारीरिक समस्यांमुळे मुलबाळ नव्हते. यातून अनेकदा त्याचे पत्नीशी खटके उडायचे. गेल्या दोन वर्षांपूर्वी समीर आणि नायराने टेक ऑफ सीटी अपार्टमेंटमध्ये सदनिका घेतली होती. रविवारी रात्री समीर झोपेतून उठला आणि मोबाईल बघत बसला. काही वेळात त्याने पत्नीला झोपेतून उठवले.
मात्र, तिने झोपेतून उठण्यास नकार दिला. त्यामुळे समीरचा राग अनावर झाला. त्याने स्वयंपाक घरातील सिलिडर आणले आणि झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्यात घातले. त्यानंतर त्याने पुन्हा तासभर मोबाईल बघितला आणि पत्नीच्या मृतदेहाशेजारीच झोपला. सकाळी हे हत्याकांड उघडकीस आले. मृत्यूनंतर त्याने प्रथम वाठोडा पोलिस ठाण्यात जाऊन घटनेची माहिती दिली. मात्र, ती त्यांची हद्द नसल्याने त्यांनी त्याबाबत हुडकेश्वर पोलिसांना माहिती दिली. दरम्यान त्याला हुडकेश्वर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. हुडकेश्वर पोलिसांनी नायरा यांचा मृतदेह ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. आरोपी पती समीरला अटक केली. पुढील तपास पोलीस करत आहे.

