Thursday, March 5, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नागपुर शहरातील एका बड्या वकिलाच्या मुलाच्या कारने घेतला दोघांचा जीव.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 14, 2023
in क्राईम, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
नागपुर शहरातील एका बड्या वकिलाच्या मुलाच्या कारने घेतला दोघांचा जीव.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संदिप सुरडकर नागपुर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- येथून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. शहरातील रामनगर भागातील सर्कलजवळ एका कारने मोटर सायकल स्वाराला धडक देऊन नंतर रस्त्याने पायी जात असलेल्या महिलेला चिरडल्याने यात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा भीषण अपघात रविवारी दिनांक 13 ऑगस्ट रोजी सकाळी 10.45 वाजताच्या सुमारास झाला. यात कुसुमाबाई ईश्वर भोयर वय 64 वर्ष, रा. संजय नगर पांढराबोडी आणि पावस राजेद्रकुमार चौरसिया वय 33 वर्ष, रा. श्रीराधे अपार्टमेंट, हिलटॉप अशी मृतकाची नावे आहेत.

घटनास्थळी उपस्थित असलेले मृतक युवकाचे वडिल राजेंद्रकुमार मातादीन चौरसिया वय 62 वर्ष यांनी या अपघाताबाबद पोलिसात तक्रार दिली. यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी कारचालक याच्यावर गुन्हा दाखल केला असून चालकाचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खासगी व्यवसाय करणारे राजेंद्रकुमार चौरसिया हे आपल्या मुलासह रामनगर येथील राममंदिराच्या रस्‍त्यावरून मोटर सायकल MH 40 BH 3625 रवीनगरच्या दिशेने जात होते. त्याच्या बाजून पायी कुसुमाताई भोयर या नातेवाईकांसह जात पायी जात होत्या. मोपेडच्या मागून कार MH 31 CP 5322 भरधाव वेगाने आली. कारने प्रथम मोपेडला जोरदार धडक दिली. त्यामुळे राजेंद्रकुमार चौरसिया हे खाली पडले आणि त्यांचा मुलगा पावस हा दुचाकीसोबत काही दूर घासत गेला. दरम्यान बाजूला असलेल्या कुसुमाताई भोयर त्यांच्या धक्क्याने खाली पडल्या. त्यांच्या अंगावरून कार त्यांना चिरडून निघाली. यामुळे त्यांचा जागी मृत्यू झाला. पावस चौरसिया यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना सायंकाळी त्यांचाही मृत्यू झाला. पोलिसांना राजेंद्रकुमार मातादीन चौरसिया यांनी दिलेल्या तक्रारीवरून विनोद म्हात्रे यांनी गुन्हा दाखल केला. वाहन चालक अद्यापही फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

आरोपी चालक मोठ्या वकिलाचा मुलगा…. रविनगर परिसरात आपल्या महागड्या कारने महिलेला चिरडत मोपेडला धडक देणारा २४ ते २५ वर्षीय युवक नागपुरातील एका मोठ्या वकिलाचा मुलगा असल्याची माहिती आहे. पोलिसांनी त्याचा शोध घेतला असता, तोही अपघातात जखमी झाला असून त्याचावर उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सोमवारी त्याला पोलिस ताब्यात घेण्याची शक्यता आहे. दरम्यान अपघात इतका भीषण होता की, परिसरात महिलेच्या रक्ताचा सडा पडल्याचे दिसून आले.

Previous Post

सांगली: सहाय्यक कामगार आयुक्त मुज्जमिल मुजावर यांचे वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियने मानले आभार.

Next Post

नागपुर: मुलं होत नसल्याने पतीने आपल्या पत्नीच्या डोक्यात सिलेंडर घालून हत्या, संपूर्ण नागपुर जिल्हा हादरला.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नागपुर: मुलं होत नसल्याने पतीने आपल्या पत्नीच्या डोक्यात सिलेंडर घालून हत्या, संपूर्ण नागपुर जिल्हा हादरला.

नागपुर: मुलं होत नसल्याने पतीने आपल्या पत्नीच्या डोक्यात सिलेंडर घालून हत्या, संपूर्ण नागपुर जिल्हा हादरला.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In