हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी मोबा.9764268694.
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत दिनांक: 15/08/2023 रोजी भारताचा 76 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रथमता: उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी बी. बी. भगत मुख्याध्यापक यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. त्यानंतर एस.एम चव्हाण स्काऊट गाईड शिक्षक यांच्या उपस्थितीत तिरंग्याला सलामी देण्यात आली. त्यानंतर घेण्यात आलेल्या कार्यक्रमात बी.बी भगत (मुख्याध्यापक) अध्यक्षस्थानी, प्रमुख पाहुणे एम. डी. टोंगे (माजी मुख्याध्यापक), आर.के. वानखेडे (गणित शिक्षक), यु.के रांगणकर (विज्ञान शिक्षक) यांची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी शाळेचे विद्यार्थी शिक्षा रामटेके, आनंदी गवई, रूपाली निमकर, त्रिशाली महानंद, अथर्व हिकरे, पवन चौधरी आदींनी स्वातंत्र्य दिनाच्या पर्वावर भाषण आणि गीत सादर केले. स्वातंत्र्य दिनाच्या या पर्वावर आर. के. वानखेडे, एम.डी. टोंगे, यु. के. रांगणकर तसेच बी. बी. भगत मुख्याध्यापक यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना संबोधित केले.
शेवटी विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस. एन. लोधे मॅडम, संचालन आर. बी. अलाम तसेच आभार प्रदर्शन एस. एम. चव्हाण यांनी केले. या कार्यक्रम सफल करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वामनभाऊ बोबडे, जगदीश कांबळे, वाल्मीक खोंडे, सुरेश मोरे, इंद्रभान अडबाले यांनी सहकार्य केले. कार्यक्रमात विद्यार्थी गण उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

