Thursday, March 5, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आरोग्य

आजपासून शासकीय रुग्णालयात उपचारासह मोफत आरोग्य तपासण्या वर्धा जिल्ह्यातील 229 शासकीय रुग्णालयाचा समावेश.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 15, 2023
in आरोग्य, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ
0 0
0
आजपासून शासकीय रुग्णालयात उपचारासह मोफत आरोग्य तपासण्या वर्धा जिल्ह्यातील 229 शासकीय रुग्णालयाचा समावेश.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा नंबर :- 9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीतीतील रुग्णालये, आरोग्य केंद्रातून मोफत वैद्यकीय चाचण्या आणि उपचाराचा निर्णय शासनाने घेतला असून उद्या दि.15 ऑगस्ट पासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

आरोग्य विभागाच्या रुग्णालयामध्ये सद्या केस पेपर दाखल करुन आणि दाखल रुग्णांकडून नाममात्र शुल्क आकारण्यात येते. मात्र यापुढे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व शासकीय रुग्णालयात रुग्णांना वैद्यकीय सेवा, तपासणी करीता शुल्क द्यावे लागणार नाही. रुग्णांना देण्यात येणा-या सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा नि:शुल्क उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाद्वारे चालविण्यात येणा-या सर्व शासकीय रुग्णालये व वैद्यकीय केंद्रामध्ये मोफत उपचाराची सोय असणार आहे. यासाठी जिल्ह्यातील 229 रुग्णालयाचा समावेश असणार आहे. दरम्यान आयुष्यमान भारत योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजना या महत्वाकांक्षी योजनेंतर्गत 5 लाख रुपयापर्यंत आरोग्य खर्चाची हमी सरकारने यापूर्वीच घेतली आहे. या योजनांमधून जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आरोग्याचे कवच उपलब्ध करुन दिलेआहे.

राष्ट्रीय रक्त धोरणानुसार रक्त व रक्त घटक पुरवठा याकरीता आकरण्यात येणारे सेवा शुल्क वगळून शासकीय रुग्णालयामधून करण्यात येणा-या तपासण्या व उपचार तसेच सार्वजनिक भागीदारी तत्वावरील वैद्यकीय सेवा निशल्क करण्यात येणार आहे. आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील आरोग्य संस्थामधील संसाधने, साधन सामुग्री, प्रशिक्षित मनुष्यबळ, औषधाची उपलब्धता, आरोग्य विषयक जनजागृती, लसीकरण, औषधोपचार असे अनेक घटक आहेत. रुग्ण शल्काचा यामध्ये समावेश होतो. सद्यस्थितीत आरोग्य संस्थामधील औषधे व उपचारावील रुग्ण शुल्क निशुल्क होणार आहे.

मोफत उपचार व निदान हा निर्णय आरोग्य विभागाचा असल्यामुळे वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत येणारी रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालयांना हा निर्णय लागू होणार नाही. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, आरोग्य उपकेंद्रे यामधील रुग्णांना मोफत उपचार मिळणार आहे, असे जिल्हा आरोग्य अधिका-यांनी कळविले आहे.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

हिंगणघाट नगर पालिकेच्या शाळेत शिक्षक भरतीत मोठा घोटाळा? चौकशी करून कारवाई करावी.

Next Post

जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे 76 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे 76 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर येथे 76 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In