🖋️ विश्वास त्रिभुवन, अहमदनगर जिल्हा प्रतनिधी
राहुरी:- गावामधून एक बातमी समोर आली आहे.
झाडाची फांदी तोडण्याच्या कारणावरून तिघा जणांनी मिळून अशोक तमनर या वयोवृद्ध इसमाला लाकडी दांड्याने मारहाण करून जखमी केल्याची घटना राहुरी तालुक्यातील धामोरी बुद्रूक येथे घडली. याबाबत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक गंगाधर तमनर शेती व्यवसाय करून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. त्यांचा पुतण्या सचिन तमनर हा त्यांच्या शेजारीच कुटुंबासह राहतो.
तमनर हे त्यांच्या घराच्या जवळ असलेल्या बोअरवेलची मोटार चालू करण्यासाठी गेले होते. त्यावेळी बोअरवेलजवळील नारळाच्या झाडाची फांदी तोडत होते. त्यावेळी तेथे आरोपी आले व फांदी तोडण्याच्या कारणावरून त्यांना मारहाण करून जखमी केले. अशोक तमनर यांच्या फिर्यादीवरून आरोपी सचिन अप्पासाहेब तमनर, छाया सचिन तमनर, मंडण अप्पासाहेब तमनर यांच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.