उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- जिल्हातील इस्लामपूर येथे दि. 15 ऑगस्ट मंगळवार रोजी स्वातंत्र दिनाचे औचित्य साधून इस्लामपुर येथे भारतीय स्टेट बँक मध्ये सिध्दनाथ ग्रुप आँफ बिझनेस यांच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिर मध्ये तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे मार्गदर्शक संस्थापक संदिपभाऊ गवई यांनी रक्तदान केले व तथागत ग्रुपच्या पदाधिकार्यांनी यामध्ये सहकार्य कले व इस्लामपूर शहरातील युवकांनी मोठ्या प्रमाणात रक्तदात्यांनी सहभाग घेऊन रक्तदान करुन सहकार्य केले..
यावेळी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे मार्गदर्शक संस्थापक संदिपभाऊ गवई, अनिकेत पवार, करण कांबळे, अमित लाखे, हेमंत कांबळे, जयकुमार कांबळे, महिला आघाडी निता बनसोडे, कोमल शिखरे, उषा कांबळे, सिमा गायकवाड आदी समस्त तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य पदाधिकारी सदस्य, महिला आघाडी, युवक, युवती आघाडी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते..