स्नेहल ससाणे पुणे शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- येथून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. येथील कारागृहातील महिला पोलिस शिपाईवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला नंतर वरीष्ठ कारागृह अधिकाऱ्याने या महिला पोलिस शिपाईला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याच्या घटनेने पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी कारागृह अधिकारी योगेश भास्करराव पाटील वय 52, रा. जेलर बंगला, कारागृह वसाहत, कोल्हापूर याला अटक करण्यात आली आहे. याबाबत एका 39 वर्षाच्या महिला शिपायाने येरवडा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला कारागृहात शिपाई या पदावर काम करते. तर, योगेश पाटील याच्याविरुद्ध यापूर्वीच गुन्हा दाखल होता. दरम्यान, दि.14 ऑगस्टच्या सकाळी संबंधित महिला घरी येत असताना योगेश पाटीलने तिला गाठले आणि तिला घेऊन तिच्या घरी गेला. त्यावेळी अंगावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर योगेशला धक्का देऊन ही महिला पोलिस शिपाई आतील खोलीत जाऊन लपली. तिन