प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- गतिमान प्रशासन होण्यासाठी हिंगणघाटला जिल्ह्याचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवेदनातून केलेली आहे.
वर्धा जिल्ह्यातील सर्व तालुक्यात मोठा असलेला हिंगणघाट तालुका व हा उपविभाग जिल्ह्यात आर्थिक दृष्टया सक्षम आहे, वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुका हा जिल्हा मुख्यालयापासून दूर अंतरावर असल्याने जाणे – येण्या करीता गैरसोयीचे ठरते. लोकसंख्येच्या दृष्टीने, व्यापाराचा दृष्टीने तसेच मूलभूत सुविधा निर्माण होण्याच्या दृष्टीने हिंगणघाट तालुका हा जिल्हा अतिशय गरजेचे आहे. तसेच इथल्या बाजारपेठ्या, कृषी उत्पन्न बाजार समिती, कापड उद्योग व औद्योगिक प्रगती ह्या सर्व बाबीत हिंगणघाट जिल्हा बनण्यास सक्षम ठरते.
सद्या राज्यात कोणकोणते शहर व तालुके जिल्हे होऊ शकते याची चाचपणी सुरू आहे. इतर राज्यातील तुलनात्मक अभ्यास केला तर आंद्रप्रदेशातील सरकारने एका दिवसात १३ नव्या जिल्ह्याची निर्मिती केली तर राजस्थान सरकारने १९ नविन जिल्ह्याची निर्मिती केली. या सर्व बाबी उपलब्ध असल्यामुळे हिंगणघाटला जिल्ह्याचा दर्जा मिळावा, ही मागणी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून लोकसंख्या सातत्याने वाढत असल्याने अशास्थितीत नागरिकांना चांगल्या सोयी- सुविधा देता याव्यात याकरिता वर्धा जिल्ह्यासह लगतच्या नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांचे विभाजन करून, या तिन्ही जिल्ह्यांच्या सीमेलगत असलेल्या वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्याला जिल्ह्याचा दर्जा देण्याची गरज आहे.
विदर्भातील नागपुर, यवतमाळ, चंद्रपुर, वर्धा चारही जिल्ह्याच्या मध्यभागी असलेल्या हिंगणघाटला यासर्व जिल्ह्चा मोठा ग्रामीण भाग जुळला आहे. येथे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय सुरु झाल्यानंतर येथील १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाला जिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळून ४०० खाटांच्या रुग्णालयाला मंजूरी मिळाली आहे. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागणीसाठी नागरिकांचा लढा सुरूच आहे. त्यामुळे आता जिल्हा निर्मितीच्या आशेचा किरण दिसू लागला आहे.
यवतमाळ जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र १३५८४ चौ. कि.मी., चंद्रपूर ११४४३ जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र चौ. कि.मी., नागपूर जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र ९८९७ चौ. कि.मी., वर्धा जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र ६३१० चौ. कि.मी.आहे. हिंगणघाट पासून चंद्रपुर जिल्ह्याची सीमा १५ किमी तर नागपूर व यवतमाळ जिल्ह्याच्या सीमा ३० किमी आहे. नागपूर जिल्ह्यातील सोनेगाव चौरस्ता, बेला, सिर्सी, वर्धा जिल्ह्यातील सिंदी रेल्वे ४० किमी.चे आत, समुद्रपूर १६ किमी, चिमूर ५८ किमी, वरोरा नागरी मांढळी मार्गे ४० किमी आहे. राळेगाव ५० किमी तर वणी वरोरा मार्गे ७० किमी, वडकी मार्गे मारेगाव ६८ किमी, पांढरकवडा ७५ किमी चे आत आहे. त्यामुळे लगतच्या तालुक्यातील कांही भाग हिंगणघाट च्या बाजारपेठ चा एक भाग असल्याने दैनंदिन गरजा साठी तेथील नागरिकांना हिंगणघाट जवळ असले तरी प्रशासकीय कामकाजा साठी त्या त्या जिल्ह्याचे मुख्यालय दूर अंतरावर व गैरसोईचे आहे.
अशास्थितीत नागपुर, यवतमाळ, चंद्रपुर, वर्धा चारही जिल्ह्याच्या मध्यभागी असलेल्या हिंगणघाटला जिल्हा होण्याचा दृष्टीने सत्कारत्मक विचार करावा व हिंगणघाट ला जिल्हा घोषित करावा. अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी असून याकडे शासन /प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन केल्या शिवाय राहणार नाही अशा स्थितीत त्याची सर्वस्वी जबाबदारी शासन/ प्रशासनाची राहील असा इशारा माजी आमदार राजुभाऊ तिमांडे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी निवेदनातून दिलेला आहे.
निवेदन देतेवेळी माजी आमदार राजुभाऊ तिमांडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, सामाजिक न्याय विभाग जिल्हा कार्याध्यक्ष प्रलय तेलंग, ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवे, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, अमोल बोरकर, माजी नगरसेवक बालाजी गहलोत, शेखर भोयर, नंदू रेडलावर, सचिन मुळतकर, सुजाता जांबुलकर, सिमा तिवारी, माधवी देशमुख, सुनील भूते, शाम इडपवार, जावेद मिर्झा, अमोल त्रिपाठी, अनिल लांबट, संदीप निंबाळकर, सरपंच प्रविण कलोडे, शकील अहमद, निखिल वदनलवार, मारोती महाकाळकर, किशोर चांभारे, अजय परबत, बबलू शेख, प्रशांत एकोणकर, जगदीश वांदिले, गोमाजी मोरे, बच्चू कलोडे, अमोल मुडे, नितीन भुते, संजय गाभुळे, प्रशांत लोणकर, राजू मेसेकर, शेखर ठाकरे, पुरुषोत्तम कांबळे, गौरव तीमांडे, सचिन पाराशर, नितेश नवरखेडे, कुणाल येसम्बरे, परम बावने, पप्पू आष्टीकर, रविकिरण कुटे, नयन निखाडे, राहुल कोळसे, चिन्मय अमृतकर, गोपाल कांबळे, पंकज वांदिले, पंकज भट, दिवाकर डफ, पंकज डवणे, संगेश ससाणे, राजू झाडे, नदीम भाई, अहमद खान पठाण, अथर्व देडे, फैजान सैय्यद, हिमांशू रंगारी, अभय सावरकर, जितू भूते, सुशील घोडे, राहुल झाडे, राहुल बोरकर, राजू वाढई, राजू मुडे, आकाश बोरीकर, मोहंमद शाहीद, रवी बोरकर, मनीष मुडे, मिथुन नखाते आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

