पंकेश जाधव पुणे ब्युरो चिफ 7020794626
चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- दिनाक १८/०८/२३ रोजी फिर्यादी नामे त्र्यंबकराव तुळशीराम पाटील, वय ७५ वर्षे, रा. स्पायसर शाळेजवळ, सांगवी रोड, औंध, पुणे यांचा फर्टिलायझर निर्मातीचा व्यवसाय असून त्यांनी त्यांच्या राहत्या बंगल्यामध्ये ११ लाख रोख रक्कम व ५५ तोळे सोन्याचे दागिणे असे एकुण- ३८,५०,०००/- रुपये किमतीचा मुददेमालाची घरफोडी झाल्याबाबत तक्रार दिल्याने चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन गुरन ५८० / २०२३ भादवी कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नमूद गुन्हयाच्या तपासादरम्यान गोपनिय बातमीदारामार्फत माहिती काढून तसेच तांत्रिक विश्लेषण करून यातील आरोपी नामे मनिष जीवनलाल राय, वय-२९ वर्ष, रा-आऊट हाऊस, सिंधु निवास बंगला, कोहिनूर प्लॅनेट सांगवी रोड पुणे. मुळपत्ता-गाव खमतारा, ता. बडवारा, जि.कटणी, राज्य मध्यप्रदेश याचा शोध घेवून त्यास दाखल गुन्हयात अटक करून त्याची पोलीस कस्टडी रिमांड प्राप्त करून त्याच्याकडे कौशल्यपूर्वक तपास करून त्याच्याकडून चोरीस गेलेल्या सोन्याचे दागिणे पैकी सर्व सोन्याचे दागिणे एकूण- २७,५०,०००/- रुपये किंमतीचे एकुण ५५ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. आरोपीस मोबाईल फोनवरून ऑनलाईन तीनपत्ती खेळण्याचा नाद असुन त्यामध्ये पैसे हारल्याने त्याने चोरी केल्याचे सांगितले, चोरी केलेल्या मुद्देमालापैकी ११ लाख रुपये रोख रक्कम देखील आरोपी ऑनलाईन तीनपत्ती खेळामध्ये हारला असल्याचे तपासात आरोपीचे बँक स्टेटमेंन्ट वरुन निष्पन्न झाले आहे. गुन्हयाचा तपास चालू असून सपोनि नरेंद्र पाटील हे पूढील तपास करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त सो. श्री. रितेशकुमार, सह पोलीस आयुक्त सो. श्री संदिप कणीक, अपर पोलीस आयुक्त सो. श्री. रंजनकुमार शर्मा, पोलीस उप आयुक्त परी ४, पुणे शहर श्री. शशीकांत बोराटे, सहायक पोलीस आयुक्त, श्रीमती आरती बनसोडे यांचे मार्गदशनाखाली चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन पुणे शहर चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बालाजी पांढरे, पोलीस निरीक्षक गुन्हे, अंकुश चिंतामण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जगन्नाथ जानकर, सहा. पोलीस निरीक्षक, नरेंद्र पाटील, पोलीस उप-निरीक्षक, रुपेश चाळके, तपास पथकातील पोलीस अंमलदार श्रीकांत वाघवले, ज्ञानेश्वर मुळे, बाबुलाल तांदळे, मारुती केंद्रे, किशोर दुशिंग, बाबा दांगडे, श्रीधर शिर्के, इरफान मोमीन, आशिष निमसे, सुधीर माने, प्रदीप खरात, सुधिर अहिवळे, विशाल शिर्के, तेजस चोपडे यांनी केली

