हनिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी मो. 9764268694
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- जिल्ह्यातील बल्लारपूर येथील सामाजिक कार्यकर्त्या गायत्री अनिल रामटेके यांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक तसेच विविध क्षेत्रातील केलेल्या कामाची दखल घेऊन पिझ्झेमा प्रेसेंट्स “द सुपर वोमेन अवॉर्ड” टिव्हि मालीका अभिनेत्री जयती भाटिया यांच्या हस्ते अशोका हाँटेल नागपुर येथे सन्मानित करण्यात आले. त्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन करण्यात येत आहे.
पिझ्झेमा प्रेसेंट्स “द सुपर वोमेन अवॉर्ड” या करीता संपूर्ण महाराष्ट्रातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांची निवड करण्यात आली होती. या पुरस्काराचा उद्देश आहे की, राज्यातील महिलांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरी गौरव करणे त्यामुळे महिला सामाजिक, सांस्कृतिक सह विविध क्षेत्रात आणि अगदी चांगल्या प्रकारे कार्य करण्याला प्रेरित होऊन अजून जोमाने कार्य करू शकतात.
गायत्रीताई रामटेके यांनी भारतीय बौध्द महासभेच्या केंद्र शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. त्या एक सृजशील पिढी व विज्ञानवादी दुष्ट्रिकोन समाजात पेरत सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक कार्य अतिशय चांगल्या पद्धतीने करत आहेत. त्यांचं कार्य हे अनेक महिलांन साठी प्रेरणादायी असू शकतो. त्यामुळे गायत्रीताई रामटेके याना या पुरस्काराने गौरविण्यात आले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348 / 7385445348

