मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- वर्धा जिल्ह्याकरीता राज्य सरकार द्वारा घोषित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट शहर मध्ये होण्याकरीता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महीलांकृती समितीचा संघर्ष सुरू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आयोजित धरने आंदोलनाचा काल 83 वा दिवस होता तसेच अनिस चे संस्थापक नरेंद्र दाभोलकर ह्याचा 20 ऑगस्ट रोजी स्मृतिदिन असतो त्यानिमित्ताने अभिवादनही करण्यात आले.
मेडिकल कॉलेज करीता महिलांच्या कार्यक्रमात ठरल्याप्रमाणे दर रविवारी वेगळे आंदोलन करण्यात येते. ह्या रविवारी महिलांनी काळे रिबीन मनगटावर बांधून सरकार चे लक्ष वेधले. विरोधी पक्ष नेते राका (प्रदेशाध्यक्ष) जयंत पाटील व हिंगणघाट विधानसभेचे आमदार समिरभाऊ कुणावर ह्यांनी विधान सभेत हिंगणघाट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट मध्ये जनतेची मागणी आहे ह्या संबंधी प्रश्न केला. त्यावर प्रतिउत्तर म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांनी समिती स्थापित करून कॉलेजचे ठिकाण निश्चित करण्यात येणार असल्याचे संगितले. अशा रीतीने कॉलेज हिंगणघाट येथे येण्यासाठी विविध प्रयत्न आताही सुरू आहेत.
यावेळी महिला कृती समितीच्या आंदोलकांनी आंदोलन तसेच पुढे रेटायचे ठरवले. त्यानुसार ८३ व्यां दिवशी महिलांनी मनगटावर काळे रिबीन बांधले आणि तो दाखऊन प्रशासन आणि स्थानिक लोक प्रतिनिधीं विषयी रोष दाखवला. वैद्यकीय महविद्यालय हिंगणघाट मध्ये येण्यास सर्व सुनियोजित कृती कराव्या अन्यथा आंदोलन पुढे खेचण्याचा इशारा शासकीय वैद्यकीय महविद्यालय महीला कृती समिती नी दिला होता. काळे रिबीन महीला केसांना लावतात पण हातावर ते बाधून महिलांनी विरोध दर्शवले.
यामध्ये प्रामुख्याने सावित्री च्या लेकी सामाजिक संस्था च्या सुचिता कांबळे, वंदना भगत, संगीता लभाने, नंदिनी मांडवे, राजश्री बांबोळे, मोनाली फुलझेले, वंदना थुल, मीरा फुलमाळी, प्रमिला कुंभारे, अस्मिता भगत, लीला थुल, सिंधू दखणे, भाग्यश्री नगराळे, शारदा जामुनकर, योजना वासेकर, लीना नगराळे, वैशाली वासेकर, सुषमा पाटील, अश्विनी निमसरकार, कल्पना वागदे, मोनिका पाटील, राशी मेश्राम, सुरेखा मेश्राम, तन्मय वासेकर इ. उपस्थित होत्या तर पुरुषांपैकी संदेश मून, चेतन ढोरे, मयूर पाटील, सुरेंद्र बोरकर, श्याम इडपवार इत्यादी उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

