आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. चंद्रपूर येथून नागपूरला जाणाऱ्या महाराजा या खाजगी ट्रॅव्हल्सचा समोरील टँकरला ओव्हरटेक करण्याच्या नादात भीषण अपघात झाला. अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून आठ ते दहा प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. हा अपघात सकाळी १० वाजताच्या सुमारास बरबटी गावानजीक झाला असून यात धीरज कुळकर्णी वय 48 वर्ष रा. बल्लापूर या प्रवाशाचा मृत्यू झाला आहे तर गंभीर जखमी असलेल्या चार ते पाच प्रवाशांवर नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
या अपघाताची माहिती मिळताच जाम पोलिस मदत केंद्र आणि सिंदी रेल्वे पोलिसांनी नोंद घेत जखमींना नागपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. तर काही किरकोळ जखमींवर प्राथमिक उपचार केले.
MH 34 BZ 0009 क्रमांकाची महाराजा ट्रॅव्हल्स चंद्रपूर येथून नागपूरकडे जात होती. दरम्यान समोर जात असलेल्या एम.एच. ०४ एफयू. २०४५ क्रमांकाच्या टँकरला ओव्हरटेक करत असताना चालकाने निष्काळजीपणे ट्रॅव्हल्स चालवून टँकरला मागाहून भीषण धडक दिली. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू तर दहा ते बारा प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे.

