अर्पित वाहाणे, आर्वी तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन आर्वी:- सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालय कन्नमवार नगर आर्वी शाखा कार्याध्यक्ष व प्रधान सचिव यांच्या वतीने 20 ऑगस्ट रोजी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या 10 व्या स्मृती दिनाच्या निमित्ताने एक झाड लावून डॉक्टर दाभोलकरांना आदरांजली वाहण्यात आली.
सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालय कन्नमवार नगर आर्वी येथे वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी प्रांजली आत्राम ग्रंथपाल सुरेश भिवगडे, ग्रंथालयाचे अध्यक्ष प्रा. डॉ. प्रवीण काळे, प्रा. डॉ. विजयाताई मुळे सामाजिक कार्यकर्त्या व आदिवासी लेखिका यशोदाताई आत्राम, प्रा. प्रवीण कांबळे व सामजिक कार्यकर्ते विनोद दादा पायले व इतर मान्यवर उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

