Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

पत्रकार संरक्षण कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करा. वंचित बहुजन आघाडी माथाडी व कामगार युनियनचे जिल्हाधिकारी यांना निवेदन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 23, 2023
in आंदोलन, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, सांगली
0 0
0
पत्रकार संरक्षण कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करा. वंचित बहुजन आघाडी माथाडी व कामगार  युनियनचे जिल्हाधिकारी यांना निवेदन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनीधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली 22:- ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन माथाडी, ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य, सांगली जिल्हा यांच्या वतीने महाराष्ट्रासहीत विविध ठिकाणी होत असलेल्या पत्रकार बांधवांच्यावर होणारे जीवघेणी हल्लांचा जाहीर पणे निषेध करीत आहोत. तसेच आपणास या निवेदनाद्वारे कळवीत आहोत की, संपूर्ण भारतभर विविध राज्यांत काही हेतूपुरस्सर विघ्नसंतोषी प्रवृत्तीचे लोकांनी जाती धर्माच्या नावाखाली अराजकता माजविण्याचा कार्य सुरु केले आहे. पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात जाती – धर्मामध्ये दंगल निर्माण करण्याचे विकृत प्रवृत्तीचे पिलावळ प्रयत्न करत आहेत. आपल्या देशात महिला, विद्यार्थिनी, लहान मुली सुरक्षीत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तरूण युवकांना नशेच्या आहारी ढकलून शिक्षणापासून परावृत्त करण्याचे काम सुरू आहे.

देशासाठी लढत असणारे सैनिकाच्या पत्नीची नग्नावस्थेत धिंड काढली जाते परंतु राज्यकर्ते या बाबतीत एक शब्द देखील काढत नाहीत हे देशाचे दुर्दैव म्हणावे लागेल. मात्र महापुरुषांच्या बाबतीत गरळ ओकत वेगळे विषय तयार करून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी काहींजण जाती – धर्माचे नावाखाली दिशाभूल करण्याचे षडयंत्र सुरू केले आहे. याबाबत सत्य सर्व सामान्य जनते समोर आपल्या निर्भीड लेखणीतून सत्य मांडणारे पत्रकार बांधवाना लक्ष करून हल्ला करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे.

तसेच सांगली जिल्ह्यात 15 ऑगस्ट स्वातंत्र दिनाच्या पार्श्वभूमीवर स्थलसिमा हद्दीत कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी या करिता प्रतिबंधक उपाय योजना म्हणून मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा न्यायदंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी 1991 च्या महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 36 (1) (3) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सांगली जिल्ह्यातील स्थलसिमा हद्दीत दि.9 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट 2023 अखेरपर्यंत दहशतवादी कृत्ये करण्यास मनाई करण्यात आली आहे. यामध्ये शस्त्रे,सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या अथवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी व सामाजिक सुव्यवस्था चे नुकसान करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू सोबत ठेवण्यास मनाई केली होती.

परंतु जिल्हाधिकारी यांचे आदेश धुडकावून सांगली जिल्ह्यात सर्व ठिकाणी शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडे तथा मनोहर कुलकर्णी यांच्या सांगण्यावरून त्यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच भारतीय स्वातंत्र्यदिन तसेच राष्ट्रध्वज विरोधात स्वातंत्र्य दिनाला आव्हान देत नंग्या तलवारी नाचवत पदयात्रा काढली आहे. मात्र पोलिस प्रशासन त्यांना संरक्षण देत बघ्याची भूमिका पार पाडताना दिसत असल्याचे बोलके चित्र लोकशाहीचा चौथा स्तंभ असणारे देश हिताचे दृष्टीने निर्भीड व परखडपणे आपले मत मांडणारे पत्रकार बांधवांनी ते चित्र आपल्या कॉमेऱ्यात कैद करून वृत्तवाहिन्यांवर प्रसिद्ध करून जनतेच्या समोर खरा चेहरा दाखवला आहे. अश्या सत्य परिस्थिती मांडणारे निर्भीड पत्रकार यांच्यावर महाराष्ट्र राज्यांमधे अनेक ठिकाणी जागोजागी जीवघेणी हल्ले होत आहेत हे गंभीरतेची बाब आहे. तसेच पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याने पत्रकारांच्या लेखन स्वातंत्र्यावर निर्बंध आणणाऱ्या दहशतवादी गावगुंडांनी तोंडवर काढले आहे. यामुळे पत्रकारांवर वरचेवर जीवघेणी हल्ले होत असताना दिसत आहेत. पत्रकार बांधव आपला जीव धोक्यात घालून सत्य परिस्थिती जनतेच्या समोर मांडत आहेत.

अलीकडेच कोकणात एका पत्रकार बांधवाला गाडीखाली चिरडून मारण्यात आले. जळगाव जिल्ह्य़ातील पाचोरा आमदाराच्या गुंडाकडून पत्रकार बांधवांना भर रस्त्यात मारहाण करण्यात आली आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यात कनेरीमठ येथे हल्ला झालेल्या पत्रकारांच्या प्रकरणी आज सहा महिने लोटले तरी आजता गायत तपास लागलेला नाही. यामुळे पत्रकार स्वसंरक्षण कायद्याची अंमलबजावणी कारणासाठी विलंब होताना दिसत आहे. या कायद्याच्या नुसार डीवायएसपी दर्जाच्या अधिकाऱ्याची तपास करण्यासाठी नियुक्ती करणे आवश्यक असताना मात्र शासकीय अधिकारी तसेच विशेषता पोलीस अधिकारी हे या कायद्याच्या बाबतीत जाणून घेण्यासाठी तयार नसल्याचे दिसत आहे. या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याने पत्रकारांच्या वर हल्ल्याचा घटना वारंवार वाढत आहेत. यामुळे आपण पत्रकार स्वसंरक्षण कायदा अधिक कडक करून लोकशाहीचा चौथा स्तंभ मजबूत करण्यासाठी पत्रकारांना संरक्षण द्यावे अन्यथा पत्रकार बांधवांच्यावर होत असलेल्या जीवघेणी हल्लांच्या विरोधात पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल. तसेच होणाऱ्या नुकसानीला महाराष्ट्र शासन जबाबदार राहणार आहे याची प्रामुख्याने नोंद घ्यावी. या आशयाचे निवेदन. जिल्हाधिकारी सांगली यांना देण्यात आले.

यावेळी जिल्हाध्यक्ष संजय कांबळे जिल्हा संपर्क प्रमुख संजय भुपाल कांबळे, जिल्हा कोषाध्यक्ष हिरामण भगत, सांगली शहर अध्यक्ष युवराज कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष सिध्दार्थ कांबळे, समीर सनदी, अख्तरहुसेन शेख, सचिन कांबळे, जगदिश कांबळे, संदीप कांबळे, आदर्श कांबळे, सुरेश आठवले, ऋषिकेश माने, परशराम कांबळे, सागर आठवले, इसाक सुतार, जावेद आलासे, सुभाष पाटील, चंद्रकांत कांबळे, विक्रांत गायकवाड, दिनेश साबळे इत्यादी आवर्जून उपस्थित होते.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 7385445348/7385445348

Previous Post

धारदार कोयत्याचा धाक दाखवुन सोनसाखळी, मोबाईल चोरी, वाहनचोरी करणारी टोळी जेरबंद गुन्हे शाखा युनिट २ ची कारवाई

Next Post

नागपुर: हिंगणा नगर पंचायत मध्ये स्वातंत्र्य दिन निमंत्रण पत्रिकेचा वाद पेटला, नगर पंचायतवर दाखल होणार मानहानीचा दावा?

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नागपुर: हिंगणा नगर पंचायत मध्ये स्वातंत्र्य दिन निमंत्रण पत्रिकेचा वाद पेटला, नगर पंचायतवर दाखल होणार मानहानीचा दावा?

नागपुर: हिंगणा नगर पंचायत मध्ये स्वातंत्र्य दिन निमंत्रण पत्रिकेचा वाद पेटला, नगर पंचायतवर दाखल होणार मानहानीचा दावा?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In