राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतीनीधी
मो नंबर 9518368177
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंडपिपरी:-ग्रामीण भागातील युवक विकासाच्या मुख्य प्रवाहात यावा. स्पर्धा परीक्षेची उत्तम तयारी व्हावी या सामाजिक भावनेतून नेहमीच सुरज माडुरवार युवकांच्या पाठीशी असतात. त्यांना आम्ही गोंडवाना विध्यापिठ प्रतिनिधी असताना विध्यार्थ्यांचे काम करताना पाहिले. त्यानंतर त्यांनी वढोली, करंजी, लिखितवाडा अभ्यासिकेला पुस्तके ठेवण्यासाठी आरमारी (बुकेस्ट) उपलब्ध करून मदतीचा हात दिला. अशे हजारो लोकहितार्थ काम सुरज माडुरवार यांनी केली आहे.
ते शिवसेनेशी जुडल्यावर अनेक कामे केली. गावात अभ्यासिका असून विद्यार्थ्यांनी म्हटलं की सुरजभाऊना पुस्तके हवी आणि भाऊंशी चर्चा त्याच्याशी चर्चा करून एका शब्दात पुस्तके देण्यास होकार देत आज स्पर्धा परीक्षेची पुस्तके उपलब्ध करून दिली. बेरोजगार युवकांचे जीवन फुलावे त्यांना यश मिळवता यावे यासाठी सुरज माडुरवार यांनी केलेली मदत मोठी आहे असे उदगार यावेळी अनेक विद्यार्थांनी का त्यांना धन्यवाद दिले. यावेळी सुरज माडुरवार मित्र परिवाराची उपस्थिती होती.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445248

