नितीन दत्ताराम शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन ठाणे:- शहरातील वाहतूक कोंडीमुळे शहरात होणारे वाढते प्रदूषण लक्षात घेता जलवाहतुकीला चालना मिळावी यासाठी खासदार राजन विचारे आमदार असल्यापासून प्रयत्न करीत आहेत. त्याला अखेर यश आले असून महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड मार्फत पहिल्या टप्प्यात केंद्र शासनाच्या सागरमाला व राज्य शासनाच्या मदतीने उभ्या राहणाऱ्या जेट्टीना १०० कोटीला प्रशासकीय मान्यता मिळाली असून कोलशेत, भाईंदर, काल्हेर व कल्याण या चार ठिकाणी जेट्टीची कामे सुरू होत आहेत. यामधील कोलशेत येथील जेट्टीची पाहणी करण्यात आली. या कोलशेत जेट्टीसाठी ३६ कोटीची मान्यता मिळाली असून याठिकाणी रो-रो व प्रवासी जेट्टीच्या कामाला आवश्यक लागणाऱ्या पर्यावरण खात्याच्या परवानग्या दि. २० जून २०२२ रोजी CRZ व MCZMA ची मिळाली असून सदर काम बफर झोन मध्ये असल्याने हायकोर्टाची परवानगी मिळणे बाकी आहे. निविदा प्रक्रियेचे काम पूर्ण झालेले आहे परवानगी मिळताच कोलशेत व खाडी पलीकडे काल्हेर येथे याचे काम सुरू होणार आहे.
तसेच येथे येणाऱ्या प्रवाशांसाठी प्रतीक्षालय व मार्गिका तयार करून या ठिकाणी चौपाटी विकसित करण्यात आलेली आहे. याचे काम २०२१ पासून सुरू होऊन या चौपाटीसाठी ५ कोटी निधी खर्च करण्यात आलेला आहे. त्यामध्ये प्रवाशांसाठी शेड, येण्यासाठी मार्ग, पार्किंग व्यवस्था, प्लॅटफॉर्मवर फरशी, फ्लेमिंगो स्टॅच्यू, रेलिंग व इलेक्ट्रिकल वर्क व इतर सुविधा करण्यात आल्या आहेत.
या पाहणी दौऱ्याकरिता खासदार राजन विचारे, महाराष्ट्र मेरी टाईम बोर्डाचे कार्यकारी अभियंता अजित मोहिते, उप अभियंता प्रशांत सानप, कॅप्टन सुरज नाईक, विधानसभा संपर्क प्रमुख नरेश मणेरा, उपजिल्हा प्रमुख सुनील पाटील, उप शहर प्रमुख संतोष शिर्के, दिपक साळवी, विभाग प्रमुख प्रदीप पूर्णेकर, माया पाटील, शाखा प्रमुख दिनेश जाबर, संजय जाधव, युवासेना अधिकारी किरण जाधव, उप जिल्हा अधिकारी ठाणे शहर अर्जुनसिंग डाभी, विभाग संघटक ज्योती कदम, अनिता हिलाल, उषा बोरुडे व इतर शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

