अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी. मो नं -9822724136
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर-24 ऑगस्ट:- सावनेर क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सावनेर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले. 14 वर्ष वयोगट मुलाच्या स्पर्धेत प्रथमेश चरपे ह्या विद्यार्थ्यांने प्रथम क्रमांक तर कुमारी रिया सहानी ह्या विद्यार्थिनींनी 17 वर्ष वयोगट मुलीच्या स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला. त्यामुळे सर्वत्र त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे.
ह्या यशाचे श्रेय विद्यार्थ्यांनी शारीरिक शिक्षक श्री.चंद्रकांत कोमुजवार, अक्षय घोरमारे तसेच आई-वडिलांना दिले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ.श्री.अशोक जीवतोडे, सचिव श्रीमती डॉ. प्रतिभा जीवतोडे, संचालक श्री. रत्नाकरजी डहाके पाटील मुख्याध्यापिका श्रीमती ममता अग्रवाल, वैशाली देशपांडे मॅडम सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृन्द यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

