मुकेश चौधरी, कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- येथील नारायण सेवा मित्रपरिवार हिंगणघाट या समाजसेवी संस्थेच्या वतीने दुर्बल व निराधार कुटुंबातील गरजू रुग्णांसाठी निःशुल्क वैद्यकीय साहित्य वाटप हा सेवाभावी उपक्रम सुरू करण्यात आला.
समाजामध्ये असे अनेक गरजू निराधार व दुर्बल कुटुंब असतात की त्यांच्यावर शस्त्रक्रियेनंतर काही कालावधीकरिता वैद्यकीय साहित्याची नितांत गरज असते. परंतु महागडे वैद्यकीय साहित्य घेण्याची आर्थिक परिस्थिती नसते. रुग्णांना विविध प्रकारच्या शस्त्रक्रिये नंतर किंवा काही असाध्य आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना बेड, व्हीलचेअर, एअर बेड, वॉकर आदी विविध वैद्यकीय साहित्याची गरज भासते. परंतु हे वैद्यकीय साहित्य महागडे असल्याने दुर्बल कुटुंबातील व्यक्ती खरेदी करू शकत नाही. त्यामुळे अशा कुटुंबातील रुग्णांची फार कुचंबणा होते. काही कालावधीनंतर हे साहित्य रुग्णाच्या उपयोगी नसते. अशा दुर्बल कुटुंबातील रुग्णांना योग्य वेळी दिलासा मिळण्यात यावा. याकरिता नारायण सेवा मित्र परिवाराच्या वतीने निःशुल्क वैद्यकीय साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामध्ये हॉस्पिटल बेड, व्हील चेअर, कमोड चेअर, वॉकर, काठी ,एअर बेड या सर्व वैद्यकीय साहित्यांचा समावेश आहे.
यावेळी नारायण सेवा मित्रपरिवार हिंगणघाट या समाजसेवी संस्थेच्या रुग्ण मित्र परिवाराचे सदस्य प्रा.किरण वैद्य, बिपिन् खिवसरा, मनोज सिंघवी, संजय मानमोडे अनुप कोठारी यांचेशी संपर्क साधावा. त्यांना त्वरित साहित्य उपलब्ध करून देण्यात येईल. असे आवाहन मित्र परिवाराचे अध्यक्ष महेश अग्रवाल व सचिव पराग मुडे यांनी केले आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348