मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- येथील रा. सु. बिडकर महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य प्रा. ज्ञानेश्वर महादेवराव वैद्य यांचे वार्धक्याने निधन झाले. ते ८९ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात ३ मुली, १ मुलगा, स्नुषा, जावई व नातवंडं असा मोठा आप्त परिवार आहे.
प्रा. ज्ञानेश्वर महादेवराव वैद्य हे नागपूर विद्यापीठात सीनेट सदस्य, समाजशास्त्र अभ्यास मंडळ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूरचे चेअरमन, वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक संघटना नुटा चे सक्रिय सदस्य व नुटा चे अध्यक्ष माजी आ स्व. बी. टी. देशमुख यांचे खंदे समर्थक मानले जात होते. स्थानिक गाडगेबाबा कब्बडी मंडळाचे उपाध्यक्ष ही होते, त्यांचा विविध सामाजिक कार्यात सहभाग होता. ते हिंगणघाट पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. किरण वैद्य यांचे वडील होत.
त्यांच्या मरणोत्तर नेत्रदान संकल्पानुसार सावंगी मेघे येथील डॉक्टर चमूने नेत्र संकलनाचे कार्य केले. त्यांची अंत्ययात्रा दिनाक २६ ऑगस्ट रोज शनिवारी सकाळी ११.३० वाजता गांधी वार्ड, स्टेट बँक मागे येथील निवास स्थानावरून निघणार आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

