मेळाव्याच्या निमित्याने माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते शेतकऱ्यांना शेतीउपयोगी साहित्य वाटप व सुशिक्षित युवक व युवतींसाठी वाचनालय चे उद्घाटन.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:-पोलीस मदत केंद्र बोल्लेपल्ली व पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून चंदनवेली येथे भव्य कृषी व जनजागरण मेळाव्याचे आयोजन केले होते त्या निमित्याने मेळाव्यात शेतकऱ्यांना कृषी उपयोगी साहित्य, विविध दाखले व युवक युवतींसाठी वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी भारत राष्ट्र समितीचे नेते,आविस विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी मेळाव्याला मार्गदर्शन करतांना बोलले की दुर्गम भागात पोलीस विभाग व पोलीस विभागा कडून सुरू केलेले पोलीस दादालोरा खिडकी च्या माध्यमातून गोरगरीब जनतेला, शेतकऱ्यांना व युवक युवतींना विविध योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळत आहे तसेच शैक्षणिक व इतर दाखल्यांसाठी तालुक्याचा ठिकाणी जाण्याचा त्रास वाचत आहे याच पूर्ण श्रेय पोलीस विभागाला जातो. या मेळाव्याच्या निमित्याने पोलीस विभाग व जनतेचा थेट संबंध आल्याने दोघांमध्ये सहकार्याची भावना निर्माण होत आहे.
पुढे एटापल्ली चे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शनजी राठोड व कृषी अधिकारी मडावी यांनी उपस्थित जनतेला मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी मंचावर माजी आमदार दिपकदादा आत्राम, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, आविस सल्लागार तथा माजी जि.प.सदस्य कारूजी रापंजी, आविस सल्लागार तथा माजी जि.प.सदस्य संजयजी चरडुके, बोल्लेपल्ली पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी मोरे साहेब, पोलीस उपनिरीक्षक जंगले साहेब, कृषी अधिकारी मडावी, ग्रा.प सदस्य रमेश वेलादी, मुख्याध्यापक सुखदेवे सर, प्रभारी मुख्याध्यापक जि.प शाळा तलांडे सर, माजी सरपंच कालंगा, पोलीस पाटील कुडयेटी, प्रतिष्ठित नागरीक राजेंद्र वैरागडे, खेडचंद्र वैरागडे सह मेळाव्याला परिसरातील शेकडो जनता व युवक युवती उपस्थित होते. तर मेळाव्याचे संचलन व आभार प्रदर्शन सोनवणे सर यांनी केले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

