सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त अधिकारी डॉ. सचिन मडावी यांचे हस्ते मुलांना अभिनंदन करण्यात आले
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- गोंडवाना सैनिक विद्यालय गडचिरोली येथे झालेल्या जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत अनु. जाती मुलांची निवासी शाळा वांगे पल्ली अहेरी जिल्हा गडचिरोली येथील अंडर -14 वयोगटात 5 विद्यार्थी आणि अंडर-17 वयोगटात 2 विद्यार्थी असे एकूण 7 विद्यार्थी विभागीय स्पर्धेकरिता पात्र झाले आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांचे सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांनी अभिनंदन केले. मुलांच्या यशाकरिता निवासी शाळा वांगेपल्ली अहेरी ने मोलाची कामगिरी बजावली. गेल्या वर्षी सुद्धा 2 विद्यार्थी राज्य स्तरावर पोहचले होते हे विशेष.
गडचिरोली जिल्हातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या यशाकरिता शाळा नेहमी तन मन धनाने प्रयत्न करीत करत आहे. या विद्यार्थ्याने मिळवलेल्या घवघवीत यशाचे सर्वत्र स्तरातून अभिनंदन होत आहे. यशस्वी विध्यार्थी अंडर=14 गटातील विध्यार्थी कुमार, प्रफुल दुर्गम, कु. राजेश कावरे, कु. महेंद्र गड्डी, कु. ज्ञानेश्वर दुर्गे, धम्मरत्न दुर्गे U=17 कु. प्रवीण अट्टेला, कु. मधुकर कारसपल्ली यांनी हे यश मिळवलं आहे.
विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशात शाळेच्या मुख्याध्यापक /क्रीडा शिक्षक गणेश दुधे सरांची मोलाची भुमिका राहीली. तसेच श्री. लांजेवार सर, श्री. पनगट्टीवार सर, श्री. पराते सर, श्री. खोब्रागडे. श्रीमती. दहगावकर, श्रीमती. झर्रे, श्रीमती चुक्कावार तसेच श्री. अजय चंद्रगिरीवार क्रिस्टल कंपनी यांनी शाळेच्या यशस्वीते करिता खूप सहकार्य केले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

