पंकेश जाधव पुणे ब्युरो चिफ 7020794626
येरवडा पोलिस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दि. २२/०८/२०२३ रोजी रामवाडी पुणे येथे १४/१५ वाचे सुमारास फिर्यादी हे दुचाकी वरून जात असताना रोडला बाजूला थांबले असताना पाठीमागून आलेल्या दुचाकी वरील इसमांनी फिर्यादी याचे पॅन्टचे खिशातील २५,०००/- रुपये जबरदस्तीने काढून घेवून गेले आहेत. म्हणून येरवडा पो. स्टे. गु. र. नं. ५७९ / २०२३ भादवि ३९२, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास करत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार प्रशांत कांबळे व सुशांत भोसले यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की. सदर गुन्हयातील आरोपी हा महंमदवाडी वानवडी भागात येणार आहे. सदरची माहिती मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक येरवडा पोलीस स्टेशन यांना कळविल्याने त्यांनी मिळालेली माहिती वरुन कारवाई करणेबाबत मार्गदर्शन केले त्याप्रमाणे तपास पथकाचे अधिकारी पोउपनि अंकुश डोंबाळे व श्रेणी पोउपनि प्रदिप सुर्वे, पोलीस अंमलदार सागर जगदाळे, अमजद शेख, प्रशांत कांबळे, सुशांत भोसले, अनिल शिंदे यांनी तेथे जावून संशयीत इसमांना पळून जात असताना अतिशय शिताफीने पकडले. त्यास त्याचे नाव पत्ता विचारता १. अस्लम इस्माईल शेख वय २० वर्षे रा चिंतामणी नगर हडपसर पुणे २. बिलाल इस्माईल शेख वय २१ वर्षे रा सय्यद नगर हडपसर पुणे असल्याचे सांगितले. त्याचेकडे चौकशी करता त्यांनी चोरी केल्याचे कबूल करून सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. सदर आरोपीस दि. २३/०८/२०२३ रोजी अटक करण्यात आली आहे. त्याचेकडून गुन्हयातील चोरीस गेलेले १०,०००/- रुपये रोख व ६०,०००/- रू किंमतीची मोटारसायकल असा एकूण ७०,०००/- रू किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच त्यांचेकडे अधिक तपास करत त्यांनी विश्रामबाग येथे २०,०००/- रु जबरदस्तीने चोरल्याचे व विश्रांतवाडी येथे ३०,०००/- रु चोरी केल्याचे कबूल केले आहे. आरोपीकडून खालील २ जबरीचोरी व १ चोरी असे एकूण ३ गुन्हे उघडकीस आणले आहेत.१. येरवडा पो स्टे गु र नं ५७९ / २०२३ भादवि ३९२ ३४ २. विश्रामबाग पो स्टे गु र नं १८३/२०२३ भादवि ३९२ ३४. ३. विश्रांतवाडी पो स्टे गु र नं २३५ / २०३३ मादवि ३७९ ,३४
सदरची कामगिरी श्री शशिकांत बोराटे सो. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-४ श्री संजय पाटील सो सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, श्री. बाळकृष्ण कदम, वपोनि येरवडा, श्री. जयदिप गायकवाड, पोनि गुन्हे, श्रीमती कांचन जाधव, पोनि गुन्हे येरवडा यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोउपनि अंकुश डोंबाळे, श्रेणी पोउपनि प्रदिप सुर्वे, पोहवा गणपत थिकोळे, दत्ता शिंदे, तुषार खराडे, पोना किरण घुटे, अमजद शेख, सागर जगदाळे, कैलास डुकरे, प्रविण खाटमोडे पोअं अनिल शिंदे, राहुल परदेशी, सुरज ओंबासे, दत्तात्रय शिंदे, प्रशांत कांबळे, सुशांत भोसले यांनी केलेली आहे.

