✒️प्रशांत जगताप, मुख्यसंपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- नुकतेच 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्यात वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कारानं गौरविण्यात आले आणि एका वेगळ्या वादाला तोंड फुटले आहे. काय राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारातही राजकारण घुसले की काय अशा प्रश्न आज सर्वसामाण्या पासून तर चित्रपट समीक्षक विचारत आहे.
देशात ज्या चित्रपटाची सर्वाधिक चर्चा होती तो चित्रपट म्हणजे साऊथ मधील दिग्गज अभिनेते असल्याचा जय भीम चित्रपटाची पण राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार डावलण्यात आल्यानं अनेकांची निराशा झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या पुरस्कारावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. साऊथ इंडियन फिल्म इंडस्ट्रीत मधील अनेक दिग्गज सेलिब्रेटीं यांनी ‘जय भीम’ या चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार का दिला नाही याविषयी विचारणा करण्यात येत आहे. यात प्रसिद्ध अभिनेता नानी चाही समावेश आहे.
सूर्या यांनी अभिनय केलेल्या ‘जय भीम’ हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटाला आयएमडीबी कडून आठ पेक्षा अधिक रेटिंग मिळाले होते. सोशल मीडिया आणि प्रत्येक स्थिकानी या चित्रपटाची सर्वाधिक चर्चाही होती. केवळ भारतातच नाहीतर जगभरामध्ये देखील जय भीम या चित्रपटाची दखल घेण्यात आली होती.
जय भीम हा चित्रपट वास्तवदर्शी असून भारतातील नागरिकाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा होता. त्यामुळे राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये जय भीम या चित्रपटाला नेमक्या कोणत्या कारणामुळे डावलण्यात आले याची विचारणा काही सेलिब्रेटींनी केली होती. काही राजकीय विचारधारेचा, सामाजिक विचारांना प्रश्न ज्या चित्रपटानं उपस्थित केले त्या चित्रपटाला कदाचित पुरस्कार देणं हे जे कुणी परिक्षक होते त्यांना आवडलेलं नाही. त्यामुळे की काय यावर्षी देखील जय भीम पुरस्काराला डावलण्यात आले.
यासगळ्यात प्रसिद्ध छायाचित्रकार पी सी श्रीराम यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी जय भीमला राष्ट्रीय पुरस्कार का दिला नाही असा प्रश्न विचारुन वेगळ्याच चर्चेला सुरुवात करून दिली आहे. आपण अजूनही नेमक्या कोणत्या विषयावरच्या चित्रपटांना प्राधान्य देतो हे सांगता येईल का, सामाजिक विषयांवरील सर्वोत्तम चित्रपटांमध्ये जय भीमचा समावेश करावा लागेल. मात्र त्याला पुन्हा एकदा डावलण्यात आले.
जय भीममध्ये सुर्यानं जो अभिनय केला त्याचेही कौतुक करावे लागेल. आम्ही सगळे एकाच क्षेत्रातून येतो ते म्हणजे चित्रपट निर्मिती. आणि त्यात जे काही चांगले घडते त्याचे कौतुक आपण करायला हवे. मात्र बऱ्याचदा जो कौतुकाचा धनी आहे त्यांचे ते होत नसल्याचे दिसून येते. अशा शब्दांत श्रीराम यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली आहे.सोशल मीडियावर जय भीम, द काश्मिर फाईल्स यावरुन वाद सुरु झाला आहे. यावेळी प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौतला नॅशनल अवॉर्ड न मिळाल्यानं तिच्यावरही टिप्पणी करण्यात आली आहे. यंदा आलियाला राष्ट्रीय पुरस्कारानं गौरविण्यात आले आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

