प्रविण जगताप उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट दि.२६ ऑगस्ट:- नेत्र संकलन केंद्र सामान्य रूग्णालय वर्धा तसेच उपजिल्हा रुग्णालय राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण व दृष्टीहिनता कार्यक्रमांतर्गत उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबीर डॉ. सचिन तडस, जिल्हा शल्यचिकीत्सक तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी समिर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली काल दि. २५ रोजी स्थानीक उपजिल्हा रुग्णालय येथे नेत्र तपासणी शिबीर संपन्न झाले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. किशोर चाचरकर वैद्यकीय अधिक्षक उपजिल्हा रुग्णालय, प्रमुख अतिथी म्हणून डॉ. मनोज सकतेपार, डॉ. नितिन निमोदिया, उप प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी गोपाल धुर्वे हे प्रामुख्याने उपस्थित होते.
दि. २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत नेत्रदान पंधरवाडा राज्यात सर्वत्र साजरा केला जातो. सदर पंधरवाड्यानिमीत्त आयोजीत कार्यक्रमाचे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.किशोर चाचरकर यांचे शुभहस्ते काल दि.२५ ऑगस्ट रोजी करण्यात आले. पंधरवाड्या निमीत्त जनजागृती करतांना नेत्रदान संकल्प तसेच वाहन चालवताना अपघात टाळण्याबाबत घ्यावयाची काळजी याबद्दल सविस्तर मार्गदर्शन डॉ. किशोर चाचरकर यांनी केले.
या शिबीराला वाहनचालक व मालक संघटना हिंगणघाट, परवाना- धारक वाहन चालक लाभार्थी म्हणून उपास्थित होते. शिबिरात एकूण १२१ परवानाधारक वाहनचालकांची तपासणी करण्यात आली. यावेळी २४ नेत्रदात्यांनी मरणोत्तर नेत्रदान संकल्प केला. या तपासणीत चष्म्याचे नंबर देण्यात आले तसेच एनसीडी विभागामार्फत आरोग्य तपासणीसुद्धा करण्यात आली.
यावेळी जिल्हा नेत्र चिकित्सक डॉ. मनोज सकतेपार यांच्या मार्गदर्शनात नेत्रचिकित्सा अधिकारी संजय बोबडे, सुरेश पाटिल, किशोर मेश्राम, प्रफुल काकडे, मनोज वानखेडे यांनी काम पाहिले. शिबीराच्या आयोजना करिता उप- प्रादेशिक परिवहन विभागामार्फत परिवहन अधिकारी गोपाल धुर्वे यांच्या मार्गदर्शनात उप प्रादेशिक परिवहन विभागाचे विशाल भगत, अमर पखान, शेखर रामटेके, सचिन घानमोडे, घनश्याम टिकास यांनी सहकार्य केले. उपरोक्त कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेत्रदान समुपदेशक प्रफुल काकडे तसेच आभार प्रदर्शन नेत्रचिकित्सा अधिकारी जिवन तांबेकर यांनी केले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

